April 1, 2025 10:54 AM April 1, 2025 10:54 AM
1
परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांनी नेदरलँडच्या परराष्ट्र मंत्र्यांची नवी दिल्लीत घेतली भेट
परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस जयशंकर यांनी नेदरलँडचे परराष्ट्र मंत्री कॅसफर वेल्दकँम यांची काल नवी दिल्ली इथं भेट घेतली. यावेळी दोनही देशांदरम्यानचा द्विपक्षीय व्यापार, गुंतवणूक, संशोधन, पाणी, कृषी, आरोग्य, संरक्षण अशा विविध मुद्यावर चर्चा झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यामावरील संदेशांत म्हटलं आहे. भविष्यात सेमीकंडक्टर्स, हरितउर्जा, शिक्षण आणि प्रतिभावंतांची देवाणघेवाण या विषयावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. वेल्दकँम यांचं दोन दिवसांच्या भारत दौऱ्यासाठी काल आगमन झालं.