December 12, 2024 7:43 PM December 12, 2024 7:43 PM

views 13

रस्ते अपघातग्रस्तांसाठी विनारोकड उपचार योजना लवकरच लागू होणार

रस्ते अपघातात जखमी होणाऱ्यांसाठी कॅशलेस उपचार योजना लवकरच देशभरात सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. या योजनेत दीड लाख रुपयांपर्यंतचे उपचार कॅशलेस पद्धतीनं मिळू शकतील, असं गडकरी म्हणाले.    लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात महाराष्ट्रातल्या राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांसंदर्भात विविध सदस्यांनी प्रश्न विचारले. धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांनी महामार्ग भूसंपादनात शेतकऱ्यांना किरकोळ मोबदला मिळत असल्याचा मुद्दा...