November 18, 2025 7:23 PM November 18, 2025 7:23 PM

views 11

टेनिसपटू कार्लोस अल्काराजची दुखापतीमुळं डेव्हिस कपच्या अंतिम फेरीतून माघार

जागतिक क्रमवारीत अग्रमानांकित टेनिसपटू कार्लोस अल्काराज यानं दुखापतीमुळं डेव्हिस कपच्या अंतिम फेरीतून माघार घेतली आहे. आज त्यानं समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. नुकत्याच झालेल्या एटीपी फायनल्स स्पर्धेवेळी त्याच्या दुखापतीनं आणखी गंभीर स्वरूप धारण केलं. या स्पर्धेत यानिक सिनर यानं त्याचा पराभव केला होता.

July 15, 2024 2:57 PM July 15, 2024 2:57 PM

views 36

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीत कार्लोस अल्काराझ विजयी

स्पेनच्या कार्लोस अल्काराजने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या अजिंक्यपदावर सलग दुसऱ्यांदा नाव कोरलं. काल झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं सर्बियाच्या द्वितीय मानांकित आणि सात वेळा विम्बल्डन विजेत्या नोव्हाक जोकोविचचा ६-२, ६-२, ७-६ असा थेट सेट्समध्ये पराभव केला.   पहिले दोन सेट सहज जिंकल्यानंतर तिसऱ्या सेटमध्ये अल्कराजला जोकोविचने टायब्रेकरपर्यंत खेचलं, पण अल्काराजने टायब्रेकर जिंकून सामनाही खिशात घातला. मिश्र दुहेरीत पोलंड आणि तैवानच्या यान जेलिन्की आणि सू वे शे या जोडीनं मेक्सिकोच्या सँतियागो गोन...

July 8, 2024 1:10 PM July 8, 2024 1:10 PM

views 11

विम्बल्डन टेनिस स्पर्धा : कार्लोस अल्काराज आणि जेनिक सिनर यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

विम्बल्डन टेनिस स्पर्धेत गतविजेता कार्लोस अल्काराज आणि अव्वल मानांकित जेनिक सिनर यांनी काल उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.     अल्काराझने  फ्रान्सच्या उगो हम्बर्ट याचा ६-३, ६-४, १-६, ७-५ असा पराभव केला. तर सिनरने अमेरिकन खेळाडू बेन शेल्टन याला ६-२,६-४,७-६(९) असं नमवलं.    सात वेळा विजेतेपद पटकावणारा नोवाक जोकोविच याचा सामना डेनिश खेळाडू वोल्गर रुन याच्याशी आज रात्री होणार आहे. जर्मन खेळाडू अलेक्झांडर ज्वेरेव याचा सामना अमेरिकेच्या टेलर फ्रित्झ याच्याशी होईल.  तर महिला एकेरित गतविजेती ए...