April 12, 2025 9:11 PM April 12, 2025 9:11 PM

views 6

राज्यातल्या २ जलविद्युत प्रकल्पांना केंद्रीय विद्युत प्राधिकरणाची मंजुरी

केंद्रीय विद्युत प्राधिकरणानं साडेसात गिगावॅट क्षमतेच्या सहा पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पांना आज मंजुरी दिली आहे. यात रायगड जिल्ह्यात भिवपुरी इथं एक हजार मेगावॅट तर नाशिक जिल्ह्यात इगतपुरी जवळ असलेल्या भावली इथं दीड हजार मेगावॅट क्षमतेच्या जलविद्युत प्रकल्पांचा समावेश आहे. इतर प्रकल्प ओदिशा, कर्नाटक, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेशातले आहेत.