September 9, 2024 2:45 PM September 9, 2024 2:45 PM
9
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची ९ उमेदवारांची यादी जाहीर
हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने ९ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात माजी खासदार बृजेंद्रसिंग यांना उचनाकलान मतदारसंघातून तर मोहित ग्रोवर यांना गुरुग्राममधून उमेदवारी देण्यात आली आहे. ९० जागांपैकी ३२ ठिकाणचे उमेदवार काँग्रेसने जाहीर केले आहेत. हरियाणा विधानसभेसाठी एकाच टप्प्यात येत्या ५ ऑक्टोबरला मतदान होणार आहे.