September 15, 2025 7:41 PM September 15, 2025 7:41 PM
7
कर्करोग सेवा उपलब्ध करण्यासाठी धोरण तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
राज्यातल्या जनतेसाठी सर्वसमावेशक कर्करोग सेवा उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्यं विभागानं धोरण तयार करावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत दिले. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सार्वजनिक आरोग्य आणि वैद्यकीय शिक्षण विभागाची बैठक वर्षा निवासस्थानी पार पडली. कर्करोगावर प्रभावी उपचार मिळण्यासाठी विविध पातळ्यांवर उपचार केंद्रं उभारणं गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. कर्करोगाशी लढणाऱ्या रुग्णांना शीघ्र निदान आणि प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध करू...