June 11, 2025 12:43 PM June 11, 2025 12:43 PM

views 9

कर्करोगाच्या नमुन्यांचं सुरक्षितपणे विश्लेषण करणासाठी एआयची निर्मिती

जगभरातल्या विविध प्रकारच्या कर्करोगाच्या नमुन्यांचं सुरक्षितपणे विश्लेषण करणारं एक एआय तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित केलं आहे. या तंत्रज्ञानामुळे कर्करोग्याची गोपनीयता सुरक्षित राखत उपचारपद्धतींवरही भर देता येणार आहे. या संपूर्ण संशोधनात सहा देशांमधल्या ३० संशोधन गटांनी गोळा केलेल्या कर्करोगाच्या सुमारे ७ हजार ५२५ नमुन्यांमधल्या प्रथिनांचं विश्लेषण करण्यात आलं.   ऑस्ट्रेलियाच्या चिल्ड्रन्स मेडिकल रिसर्च इन्स्टिट्युटच्या नेतृत्वाखालील संशोधकांनी याविषयीची माहिती दिली आहे. गोपनीयतेचे कठोर ...

April 28, 2025 11:21 AM April 28, 2025 11:21 AM

views 9

२०० कर्करोग निगा केंद्रं उभारली जाणार- आरोग्य मंत्री

येत्या वर्षात कर्करोगाच्या उपचारांवर अधिक लक्ष केंद्रीत केलं जाणार असून, देशात मोठ्या प्रमाणावर उपचार सुविधा निर्मितीवर भर देणार असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा यांनी काल महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगर इथं सांगितलं. शासकीय कर्करोग रुग्णालयातल्या ट्रू बीम युनिट या कर्करोगावरील अतिविशेष उपचार देणाऱ्या अत्याधुनिक यंत्र प्रणालीचं आणि कर्करोग संस्थेच्या इमारतीच्या विस्तारीत इमारतीचं लोकार्पण करताना ते बोलत होते.   कर्करोगाचं निदान वेळेवर आणि लवकर करण्यासह ९० टक्के रुग्णांवर एक महिन...

September 22, 2024 8:20 PM September 22, 2024 8:20 PM

views 5

कर्करोग मूनशॉट उपक्रमासाठी साडेसात दशलक्ष डॉलर आणि ४० दशलक्ष लस मात्रा देण्याची प्रधानमंत्र्यांची घोषणा

लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर डेलावेर इथं आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांच्या सामायिक निर्धार अशा उपक्रमातून प्रतिबिंबित होत...