November 5, 2024 1:09 PM November 5, 2024 1:09 PM

views 13

कॅनडामध्ये फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रधानमंत्र्यांकडून निषेध

  कॅनडामध्ये काल ओंटारियोमधल्या ब्रॅम्प्टन इथं हिंदू मंदिरात दहशतवादी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तीव्र शब्दांत निषेध केला आहे. अशा हल्ल्याद्वारे कॅनडातील भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणे हा भ्याडपणा आहे.   अशा घटनांमुळे भारताचा संकल्प अजिबात ढळणार नाही. असं त्यांनी समाज माध्यमाद्वारे प्रसिद्ध केलेल्या आपल्या संदेशात म्हटल आहे. कॅनडा सरकारने देशात कायदा सुव्यवस्था राहील याची काळजी घ्यावी आणि या हल्ल्याबाबत योग्य कारवाई करावी अ...

November 4, 2024 8:29 PM November 4, 2024 8:29 PM

views 7

कॅनडामध्ये हिंदू सभा मंदिरात अतिरेक्यांनी केलेल्या हिंसाचाराचा भारताकडून निषेध

कॅनडामध्ये काल ओंटारियो इथं ब्रॅम्प्टनमधल्या हिंदू सभा मंदिरात अतिरेकी आणि फुटीरतावाद्यांनी केलेल्या हिंसाचाराचा भारताने निषेध केला आहे. कॅनडामधल्या  भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारताने  तीव्र चिंता व्यक्त केली आहे. सर्व प्रार्थनास्थळे अशा हल्ल्यांपासून सुरक्षित राहतील, हिंसाचार करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी भारताची अपेक्षा आहे, असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी कॅनडा सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे. दरम्यान व्हँकुव्हर आणि सरे इथंही २ आणि ३ नोव्हेंबरला अ...

November 2, 2024 8:29 PM November 2, 2024 8:29 PM

views 20

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर कॅनडानं केलेल्या आरोपांवरुन भारताकडून तीव्र नाराजी व्यक्त

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या बद्दल कॅनडाचे उपमंत्री डेव्हिड मॉरिसन यांनी तिथल्या राष्ट्रीय सुरक्षा स्थायी समितीसमोर केलेल्या आरोपाबद्दल भारताने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने नवी दिल्लीतल्या कॅनेडीयन उच्चा युक्तालयातल्या प्रतिनिधीला काल बोलावून याबाबत निषेध नोंदवला. अशा प्रकारे बेजबाबदार वक्तव्य केल्यास त्याचा उभयपक्षी संबंधावर गंभीर परिणाम होऊ शकतो असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितलं. कॅनडात कार्यरत काही भारतीय अधिकाऱ्यांवर...

October 17, 2024 3:07 PM October 17, 2024 3:07 PM

views 12

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचे ठोस पुरावे नसल्याची कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांची कबुली

खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात होता हे आरोप करताना कॅनडाकडे कुठलेही ठोस पुरावे नव्हते. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हे आरोप केल्याची कबुली कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन ट्रुडू यांनी त्यांच्या देशातल्या चौकशी समितीसमोर दिल्याचं वृत्त आहे.   यामुळं भारताची भूमिका स्पष्ट होते. भारत आणि भारताचे राजनैतिक अधिकारी यांच्यावर लावलेल्या आरोपांच्या समर्थनार्थ एकही पुरावा कॅनडानं दिला नसल्याचा पुनरुच्चार भारतानं केला. कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टीन ट्रुडू यांच्यामु...

October 15, 2024 2:38 PM October 15, 2024 2:38 PM

views 14

भारतात कार्यरत असलेल्या कॅनडाच्या ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी जाण्याचे भारताचे आदेश

भारतात कार्यरत असलेल्या कॅनडाच्या ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना माघारी जाण्याचे आदेश भारतानं दिले आहे. त्यात प्रभारी उच्चायुक्त स्ट्युअर्ट रॉस व्हीलर, उप उच्चायुक्त पॅट्रीक हेबर्ट याशिवाय इतर ४ अधिकाऱ्यांना मायदेशी परतण्याचे आदेश भारतानं दिले आहेत. या सर्वांना शनिवारपर्यंत भारत सोडून जायला सांगितलं आहे. याशिवाय भारतानं कॅनडातील आपल्या उच्चायुक्तांसह अन्य राजनैतिक अधिकाऱ्यांनाही माघारी बोलावलं आहे. कॅनडातलं विद्यमान सरकार त्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्याची बांधिलकी पाळेल याची खात्री नसल्यानं त्यांना मा...

September 19, 2024 1:40 PM September 19, 2024 1:40 PM

views 8

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अभ्यास परवान्यांमध्ये कपात करण्याचा कॅनडाचा निर्णय

आपल्या देशातले तात्पुरत्या रहिवाशांच्या संख्येचं व्यवस्थापन व्हावं या हेतूने कॅनडाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अभ्यास परवान्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.   इमिग्रेशन, रिफ्युजीस अँड सिटिझनशिप कॅनडाने काल वार्ताहरांना ही माहिती दिली. पुढच्या वर्षी नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अभ्यास परवान्यांमध्ये यंदा पेक्षा १० टक्के कपात केली जाणार आहे. 

June 15, 2024 2:32 PM June 15, 2024 2:32 PM

views 26

टी-ट्वेंटी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा कॅनडासोबत सामना

आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारत आणि कॅनडा संघांमध्ये सामना होणार आहे. हा सामना फ्लोरिडा इथल्या सेंट्रल ब्रॉवर्ड पार्क मैदानावर भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री आठ वाजता सुरू होईल. काल वेस्ट इंडिजच्या लॉडरहिलमध्ये दक्षिण आफ्रिका आणि नेपाळ यांच्यात चुरशीचा सामना झाला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नेपाळवर अवघ्या एका धावेनं विजय मिळवला. तर अमेरिका आणि आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द झाला. चांगल्या धावगतीच्या जोरावर  अमेरिकेने सुपर आठमध्ये प्रवेश केला आहे. अमेरिकेच्या संघांनं पदार...