July 5, 2025 3:16 PM July 5, 2025 3:16 PM
18
कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या किदांबी श्रीकांतचा उपांत्यफेरीत प्रवेश
कॅनडा खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीत भारताच्या किदांबी श्रीकांतनं चमकदार खेळ करत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. श्रीकांतनं जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेल्या चायनीज तैपेईच्या चोऊ टीएन चेन चा केवळ ४३ मिनिटांत २१-१८, २१-९ असा सरळ सेट मध्ये पराभव केला. उपांत्यफेरीत आज श्रीकांतचा सामना जपानच्या केंटा निशिमोटो बरोबर होणार आहे.