April 29, 2025 1:40 PM April 29, 2025 1:40 PM

views 4

कॅनडा निवडणूकीत लिबरल पार्टी १६७ जागांनी आघाडीवर

कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणूक निकालाचे कल आले असून मार्क कार्नी यांच्या नेतृत्वाखालील लिबरल पार्टी १६७ जागांवर आघाडी घेऊन विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. तर पीअर पॉइलीवर यांची कॉन्झर्वेटिव्ह पार्टी १४५ जागांवर आघाडीवर आहेकॅनडाच्या ३४३ सदस्यांच्या संसदेत बहुमत मिळवण्यासाठी १७२ जागा जिंकणं आवश्यक आहे.   त्यामुळे लिबरल पार्टी विजयाच्या जवळ पोहोचली आहे. सक्षम आणि स्वतंत्र कॅनडाच्या निर्मितीसाठी नागरिकांनी तयार राहावं असं आव्हान कार्नी यांनी केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅ...

April 28, 2025 9:23 PM April 28, 2025 9:23 PM

views 2

कॅनडामध्ये सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान

कॅनडामधे आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं. ३४३ जागांसाठी हे मतदान होत असून ही निवडणूक कॅनडाचा पुढचा प्रधानमंत्री कोण असेल हे ठरवणार आहे. लिबरल पार्टी आणि कॉन्झर्वेटिव्ह पार्टी या दोन प्रमुख पक्षांमधे सत्तेसाठी स्पर्धा आहे. सत्तास्थापनेसाठी १७२ जागा निवडून येणं गरजेचं आहे. लिबरल पार्टीचे नेते मार्क कार्नी आणि कॉन्झर्वेटिव्ह पार्टीचे नेते पीअर पॉइलीविएर हे प्रधानमंत्रीदाचे दावेदार आहेत.

April 28, 2025 1:39 PM April 28, 2025 1:39 PM

views 6

कॅनडामधे आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू

कॅनडामधे आज सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झालं. भारतीय प्रमाणवेळेनुसार आज सकाळी सहा वाजता न्यूफाऊंडलँड आणि लॅब्रॉडर इथं मतदान सुरू झालं.   उद्या सकाळी साडे आठ वाजेपर्यंत ब्रिटिश कोलंबिया इथं शेवटच्या टप्प्यातली मतदानाची प्रक्रिया पूर्ण होईल. आतापर्यंत ७० लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. अमेरिकेने लादलेलं आयात शुल्क हा यंदाच्या निवडणुकीतला महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे.

March 24, 2025 2:47 PM March 24, 2025 2:47 PM

views 6

कॅनडामध्ये येत्या २८ एप्रिलला निवडणुका होणार

कॅनडामध्ये येत्या २८ एप्रिल रोजी निवडणुका होणार असल्याची घोषणा प्रधानमंत्री मार्क कार्नी यांनी केली आहे. यासाठी त्यांनी रविवारी गर्व्हनर जनरल मेरी सायमन यांची भेट घेऊन संसद विसर्जित करण्याची विनंती केली होती. ती सायमन यांनी मान्य केली  आहे. त्यामुळं या आगामी निवडणुकांमध्ये कार्नी यांचा सामना कंझर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते पियरे पॉइलीव्हरे यांच्याशी होणार आहे.    सध्या अमेरिकेसोबत सुरू असलेलं व्यापार युद्ध आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प कॅनडाला अमेरिकेचे ५१ वं राज्य बनवण्यासाठी देत  असलेल्...