November 1, 2025 8:10 PM

views 36

कॅनडाच्या प्रधानमंत्र्यांची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांकडे दिलगिरी व्यक्त

कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कॅर्नी यांनी टॅरिफ विरोधी राजकीय जाहिरातीबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडे दिलगिरी व्यक्त केली असून ऑन्टेरियोचे प्रमुख ड्युग फोर्ड यांना जाहिरातीचे प्रक्षेपण न करण्याची सूचना केली आहे. आपण ट्रम्प यांच्याकडे खासगीत दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती कॅर्नी यांनी दक्षिण कोरियात आज आशिया पॅसिफिक बैठकीनंतर वार्ताहरांना दिली. १६ ऑक्टोबरला ही जाहिरात प्रसारित झाल्यानंतर  डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडाबरोबर सर्व व्यापारी वाटाघाटी बंद करून कॅनडातून होणाऱ्या आयाती...

September 30, 2025 10:32 AM

views 47

कॅनडाकडून ‘बिश्नोई समूह’ दहशतवादी संघटना म्हणून सुचीबद्ध

कॅनडाने बिश्नोई समूहाला फौजदारी संहितेअंतर्गत दहशतवादी संघटना म्हणून सुचीबद्ध केले आहे. या कारवाईमुळे, कॅनडाच्या कायदा अंमलबजावणी संचालनालयामार्फत या गटाची मालमत्ता, वाहने, संपत्ती जप्त केली जाऊ शकते. त्यामुळे समूहाला होणारा वित्तपुरवठा, प्रवास आणि नवी भरती यांसंदर्भातल्या दहशतवादी गुन्ह्यांवर कारवाई करता येणार आहे. विविध गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेल्या या समूहाकडून खंडणी वसूल करणे आणि धमकी देत दहशत निर्माण करणे अशा स्वरुपाचे गुन्हे होत असल्याचं कनडानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

September 21, 2025 8:06 PM

views 31

यूके, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाकडून पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता

यूनायटेड किंगडम, कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पॅलेस्टाईनला देश म्हणून अधिकृत मान्यता दिली आहे. ब्रिटनचे प्रधानमंत्री केयर स्टारमर यांनी एका व्हिडिओ निवेदनात ही घोषणा केली. शांतता आणि समाधानाच्या दिशेनं हे महत्वाचं पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नि यांनी देशाच्या शांततेसाठी या मान्यतेला दुजोरा दिला. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी देखील संयुक्त निवेदनाद्वारे पॅलेस्टाईनला स्वतंत्र आणि सार्वभौम राज्य म्हणून मान्यता दिली.

June 14, 2025 1:04 PM

views 19

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून पाच दिवस सायप्रस, कॅनडा आणि क्रोएशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्टोडोलाइड्स यांच्या निमंत्रणावरून ते उद्या सायप्रसला भेट देतील. या दौऱ्यादरम्यान ते राष्ट्राध्यक्ष क्रिस्टोडोलाइड्स यांच्याशी चर्चा करतील, तसंच लिमासोल इथं उद्योगपतींशी संवाद साधतील. दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात, कॅनडाचे प्रधानमंत्री मार्क कार्नी यांच्या निमंत्रणावरून प्रधानमंत्री मोदी १६ जून रोजी कॅनडाच्या कानानास्किस इथं जी-७ परिषदेत सहभागी होणार आहेत. इथं ते जी-७ ...

March 7, 2025 1:50 PM

views 20

कॅनडा, मेक्सिकोच्या आयातीवर कर लागू करण्याचा निर्णय अमेरिकेनं पुढे ढकलला

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिकोच्या अध्यक्षांशी चर्चा केल्यानंतर बहुतेक वस्तूंवरचा २५ टक्के कर लागू करण्याचा निर्णय एक महिन्यासाठी पुढे ढकलला आहे. त्यांनी काल ही घोषणा केली. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात कॅनडा आणि मेक्सिकोशी केलेल्या व्यापार कराराचं पालन करणाऱ्या वस्तूंना ही सवलत लागू होईल. मात्र, अमेरिकेच्या निर्यातीवर शुल्क आकारणाऱ्या देशांवर अमेरिका येत्या २ एप्रिलपासून आयात कर लागू करण्यावर ठाम असल्याचं ट्रम्प यांचे वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक यांनी स्पष्ट क...

March 4, 2025 1:48 PM

views 25

अमेरिकेची कॅनडा, मेक्सिको, चीनवर आयात शुल्क आकारण्याची घोषणा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा आणि मेक्सिकोवर २५ टक्के तर चीनवर २० टक्के आयात शुल्क आकारण्याची घोषणा केली आहे. हे शुल्क आजपासून लागू झालं आहे. कॅनडाने १५० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकी वस्तूंवर २५ टक्के कर लादणार असल्याचं म्हटलं आहे.   चीनने अमेरिकेच्या कृषी आयातीवर १० ते १५ टक्के कर लावण्याची घोषणा केली असून मेक्सिकोनेही प्रत्युत्तर देण्याचा निर्धार केला आहे. या करांमुळे कॅनडा आणि मेक्सिकोतून अमेरिकेत येणारे अंमली पदार्थ आणि स्थलांतरितांना आळा घालण्यासाठी अधिक कारवाई करता ये...

February 2, 2025 1:23 PM

views 21

अमेरिकेविरोधात प्रत्युत्तरात्मक शुल्क टॅरिफ लावण्याची कॅनडाची घोषणा

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या करांना प्रतिसाद म्हणून, कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो यांनी देशात येणाऱ्या १५५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लावायची घोषणा केली आहे. ओटावा इथं वार्ताहर परिषदेत बोलताना, ट्रूडो यांनी मंगळवारपासून ३० अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर २५ टक्के कर लावायची घोषणा केली आणि २१ दिवसांत १२५ अब्ज डॉलर्सच्या अमेरिकन वस्तूंवर असाच कर लावायची घोषणा केली. या विषयावर विविध प्रातांचे प्रमुख आणि मंत्रिमंडळाशी चर्चा केली असून आणि मेक्सिकोचे अध्यक्...

January 29, 2025 10:35 AM

views 28

कॅनडामध्ये भारतीय यंत्रणांचा कथित हस्तक्षेप असल्याच्या अहवालाचं भारताकडून खंडन

कॅनडामध्ये भारतीय यंत्रणांचा कथित हस्तक्षेप असल्याचा कॅनडा सरकारच्या अहवालाचं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं खंडन केलं आहे. उलट कॅनडा भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करत असल्याची टीका भारतानं केली आहे. अशा हस्तक्षेपामुळे अनधिकृत स्थलांतर आणि गुन्हेगारी प्रवृतीला खतपाणी घालतात, या अहवालातील भारताविषयीचे आक्षेप फेटाळून लावले तसंच बेकायदा स्थलांतरास सक्षम करणारी यंत्रणा यापुढे स्वीकारली जाणार नाही असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे.

January 17, 2025 8:47 PM

views 24

भारतीय वंशाचे कॅनडातले संसद सदस्य चंद्र आर्य कॅनडाच्या प्रधानमंत्रीपदाच्या शर्यतीत

भारतीय वंशाचे कॅनडातले संसद सदस्य, चंद्र आर्य यांनी आपण कॅनडाच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत उतरल्याची अधिकृत घोषणा केली आहे. कर्नाटकातल्या तुम कुर जिल्ह्याचे मुळ रहिवासी असलेले आर्य, हे कॅनडातल्या नेपीयन विभागातून संसद सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

November 10, 2024 7:56 PM

views 20

कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये पहिल्यांदा एका मुलाला बर्डफ्ल्युची लागण

कॅनडातल्या ब्रिटिश कोलंबियामध्ये एका कुमारवयीन मुलाला बर्डफ्ल्युची लागण झाली असून एच-५ या विषाणूमुळे कोंबड्या आणि पक्षांना होणाऱ्या या आजाराची लागण माणसांना व्हायची त्या देशातली ही पहिलीच वेळ आहे. लहान मुलांसाठीच्या विशेष रुग्णालयात या मुलावर उपचार सुरु असून अशी लागण होण्यामागच्या कारणांचा शोध घेतला जात असल्याची माहिती तिथल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.