November 1, 2025 10:40 AM November 1, 2025 10:40 AM
13
‘स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान’ या मोहिमेअंतर्गत भारताचे तीन गिनीज विश्व विक्रम
'स्वस्थ नारी, सशक्त परिवार अभियान' या मोहिमेअंतर्गत भारताने तीन गिनीज विश्व विक्रम केले आहेत. 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान झालेल्या या मोहिमेत लोकांचा अभूतपूर्व असा सहभाग दिसून आला. या उपक्रमाने अनेक विक्रम प्रस्थापित केलेअसून एकाच महिन्यात सर्वाधिक 3 कोटी 21 लाख लोकांची आरोग्य सेवा नोंदणी या अभियानात झाली आहे.