July 27, 2025 2:15 PM July 27, 2025 2:15 PM
17
कंबोडिया आणि थायलंडचे नेते युध्दविरामावर चर्चेसाठी तयार – अमेरिका
कंबोडिया आणि थायलंडचे नेते युध्दविरामावर चर्चेसाठी तयार असल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. या दोन देशांमध्ये गेले तीन दिवस सुरु असलेला संघर्ष थांबवण्यासाठी ट्रम्प यांचे प्रयत्न सुरु आहेत. कंबोडिया आणि थायलंडच्या सीमावर्ती भागातला संघर्ष थांबला नाही, तर अमेरिका दोन्ही देशांबरोबर व्यापार करार करणार नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला आहे. दरम्यान, थायलंडचे प्रधानमंत्री फुमथम वेचायचाई यांनी ट्रम्प यांच्या मध्यस्थीबद्दल आभार मानले आहेत. थायलंड युद्धबंदीसा...