December 25, 2025 12:24 PM

views 26

अमेरिकेत मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती जाहीर

अमेरिकेत, कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गॅव्हिन न्युसॉम यांनी मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियात मोठ्या स्वरूपाच्या पुराची शक्यता न्युसॉम यांनी व्यक्त केली आहे. यादरम्यान झाडं पडण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.   

October 8, 2025 8:11 PM

views 40

कॅलिफोर्नियात दिवाळीची शासकीय सुट्टी जाहीर

कॅलिफोर्निया राज्याने दिवाळीच्या सणाला अधिकृत मान्यता दिली असून भरपगारी शासकीय सुट्टी देखील मंजूर केली आहे. याअगोदर अमेरिकेतल्या पेनसिल्वानिया आणि कनेटिकट या राज्यांनी दिवाळीची अधिकृत शासकीय सुट्टी जारी केली आहे.

June 11, 2025 3:28 PM

views 20

लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्निया प्रांतांमध्ये कालपासून जमावबंदी लागू

अमेरिकेतल्या लॉस एंजेलिस आणि कॅलिफोर्निया प्रांतांमध्ये कालपासून मर्यादित स्वरुपाची जमावबंदी लागू केली आहे. रात्री आठ ते सकाळी सहा या वेळात कर्फ्यू लागू असेल आणि तेथे कामासाठी येणाऱ्यांना तो लागू नसेल, असं गवर्नर कॅरेन बास यांनी स्पष्ट केलं. लॉस एंजेलिसमध्ये लुटालुटीच्या तसंच हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी हा कर्फ्यू लागू केल्याचंही त्यांनी  म्हटलं आहे.

December 6, 2024 3:20 PM

views 17

अमेरिकेत उत्तर कॅलिफोर्नियाच्या काही भागात भूकंपाचा धक्का

अमेरिकेत काल उत्तर कॅलिफोर्नियाच्या काही भागात भूकंपाचा धक्का जाणवला. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ७ इतकी होती. या धक्क्यानंतर त्सुनामीची चेतावणी दिल्यामुळे किनारपट्टीवरच्या लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. हम्बोल्ट काऊंटीच्या फेरंडल शहराच्या पश्चिमेला या भूकंपाचं केंद्र होतं असं अमेरिकाच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणानं सांगितलं आहे. अद्याप कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नाही.