December 15, 2025 3:59 PM December 15, 2025 3:59 PM
26
राज्यशासनाच्या बहुतेक विभागांमधे अनुदाने वेळेवर खर्च होत नसल्याचं कॅगचं निरीक्षण
राज्य सरकारमधल्या अनेक विभागांनी गेल्या आर्थिक वर्ष अखेर सुमारे पावणे २ लाख कोटी रुपयांच्या खर्चाचे हिशोब सादर केलेले नाहीत, असं कॅगच्या अहवालात समोर आलं आहे. रविवारी विधीमंडळात हा अहवाल सादर करण्यात आला. त्यानुसार ३१ मार्च रोजी संपलेल्या आर्थिक वर्षाअखेर सुमारे पावणे ५३ हजार प्रकरणांमध्ये १ लाख ७७ हजार कोटींहून अधिक रुपयाच्या खर्चाचे हिशेब सादर झालेली नाहीत. तर ४० हजारांहून अधिक प्रकरणांमध्ये १ लाख ३७ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची खर्चाचे हिशोब सादर झाल्याचं कॅगनं नमूद केलं आहे. नगर विकास विभ...