December 15, 2024 8:42 PM

views 26

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना अडीच वर्षासाठी मंत्रीपदाची संधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या आमदारांना अडीच वर्षासाठी मंत्री पदाची संधी देण्याचा निर्णय घेतला असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे आहे. नागपूरमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या  विदर्भातल्या पदाधिकारी आणि कार्यकत्यांचा मेळावा झाला, त्यावेळी ते बोलत होते. यामुळे इतर आमदारांना संधी मिळेल असं ते म्हणाले.