January 1, 2025 8:39 PM January 1, 2025 8:39 PM
3
डीएपी खतांवर प्रतिटन ३,५०० रुपये विशेष अनुदान पुढं चालू ठेवण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
डीएपी, अर्थात डायअमोनियम फॉस्फेट खतांवर प्रतिटन साडेतीनहजार रुपये विशेष अनुदान पुढं चालू ठेवण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला. हा निर्णय पुढच्या आदेशांपर्यंत लागू राहील, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर बातमीदारांना सांगितलं. प्रधानमंत्री पीक विमा योजना आणि हवामानाधारित पीकविमा योजनेला २०२५- २६ या आर्थिक वर्षापर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला. या योजनांवरची एकूण तरतूद एकोणसत्तर हजार ५१५ कोटी रुपयांनी वाढवली आहे. या योजनेचे...