October 28, 2025 6:58 PM October 28, 2025 6:58 PM
23
Cabinet Decisions: रबी हंगामासाठी खतांवर ३७,९५२ कोटी अनुदान
रबी हंगामासाठी खतांवर ३७ हजार ९५२ कोटी अनुदान देण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आज नवी दिल्लीत झाली, त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली. यामुळे शेतकऱ्यांना वाजवी दरात खतं उपलब्ध होतील, असं वैष्णव म्हणाले. खतांचे आंतरराष्ट्रीय दर लक्षात घेऊन खतांच्या अनुदानाचे नवे दर निश्चित केल्याचं त्यांनी सांगितलं. हे दर एक ऑक्टोबरपासून लागू होतील. आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भ अटींना आज केंद्रीय मंत्रिम...