April 22, 2025 9:08 PM April 22, 2025 9:08 PM
8
मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा द्यायला मंत्रिमंडळात मान्यता
केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगानं राज्यातल्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी तयार केलेल्या महाराष्ट्र कामगार संहिता नियमांना आज राज्य सरकारनं मंजुरी दिली. मुंबईत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. केंद्र सरकारने २९ कामगार कायद्यांचं एकत्रिकरण करून चार कामगार संहिता तयार केल्या आहेत. या कामगार संहिताची अंमलबजावणी करण्यासाठी राज्यांना नियम तयार करावे लागणार आहेत. त्यानुसार राज्याच्या कामगार विभागानं महाराष्ट्र वेतन संहिता नियम २०२५ आणि महाराष्ट्र औद्योगिक संबंध संहिता ...