October 28, 2025 6:58 PM October 28, 2025 6:58 PM

views 85

विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला मान्यता

विकसित महाराष्ट्र २०४७ च्या व्हिजन डॉक्युमेंटला राज्य सरकारने मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाच्या मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. यानुसार व्हीएमयू अर्थात विकसित महाराष्ट्र व्हिजन मॅनेजमेंट युनिट  गठित करण्यात येणार आहे. नागरिकांकडून अभिप्राय मागवून त्यांचं कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित विश्लेषण करून दस्तावेज तयार केलं जाईल. या अंतर्गत १६ संकल्पना आणि शंभर उपक्रम निश्चित केले जाणार आहेत. शाश्वत नागरी आणि शहरी विकास, प्रगतीशील शेती, सर्व...

October 7, 2025 7:50 PM October 7, 2025 7:50 PM

views 30

Cabinet Decision : भुसावळ-वर्धा आणि गोंदिया-डोंगरगड दरम्यान अतिरीक्त रेल्वे मार्गिका

भुसावळ-वर्धा, गोंदिया-डोंगरगड यासह एकंदर ८९४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गिकांच्या विकासाला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. यासाठी एकंदर २४ हजार ६३४ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.    भुसावळ आणि वर्धा दरम्यानच्या ३१४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरच्या तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेला, तसंच गोंदिया - डोंगरागड या ८४ किलोमीटरच्या रेल्वे मार्गावरच्या चौथ्या मार्गिकेला यात मंजुरी मिळाली.    इटारसी - भोपाळ - बिना दरम्यान चौथी मार्गिका, वडोदरा - रतला...

October 7, 2025 7:27 PM October 7, 2025 7:27 PM

views 750

Maharashtra : राज्य मंत्रिमंडळ निर्णय

राज्याच्या सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती आणि नगरपरिषदेतल्या सांडपाण्यावर प्रक्रिया करायच्या धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. राज्यभरातल्या ४२४ नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये हे धोरण राबवलं जाईल. महाराष्ट्र रत्नं आणि दागिने धोरण २०२५ सुद्धा या बैठकीत मंजूर झालं.   सोनं, चांदीचे दागिने, हिरे, रत्नं यांच्याशी निगडीत उद्योग-व्यवसाय वाढीला चालना मिळणार आहे. या क्षेत्रात एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून पाच लाख नवीन रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलं आहे. तुकडे बंदी अधिनि...

September 30, 2025 4:49 PM September 30, 2025 4:49 PM

views 128

राज्य मंत्रिमंडळ निर्णय

राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक असं धोरण आखून प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध करुन देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. त्यानुसार त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित केली जाईल. राज्यभरात १८ रुग्णालयांमधे कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होतील. यासाठी १०० कोटी रुपये भाग भांडवलाची महाकेअर, अर्थात महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन ही कंपनी स्थापन केली जाणार आहे.    औद्योगिक, वाणिज्यिक आण...

September 16, 2025 3:52 PM September 16, 2025 3:52 PM

views 510

Cabinet Decisions: महाराष्ट्र मंत्रिमंडळ निर्णय

महाराष्ट्र ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण २०२५ आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत जाहीर करण्यात आलं. यासाठी सन २०५० पर्यंतचं नियोजन असून सुमारे ३ हजार २६८ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. तसंच राज्याच्या पायाभूत सुविधा उपसमितीला मंत्रिमंडळ समितीचा दर्जा देण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यापुढे ही उपसमिती, मंत्रिमंडळ समिती म्हणून काम करेल.   मागासवर्गीय शासकीय वसतीगृहातल्या वि...

August 9, 2025 2:37 PM August 9, 2025 2:37 PM

views 2

एलपीजी सिलिंडरसाठी ३० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर

केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात एलपीजी सिलिंडर मिळावं यासाठी ३० हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. पेट्रोलियम कंपन्यांना नुकसानीची भरपाई म्हणून ही रक्कम दिली जाणार आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय झाला. याशिवाय प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी १२ हजार कोटी रुपयांहून अधिक निधीलाही मंत्रीमंडळानं मंजुरी दिली. सध्या या योजनेचे १० कोटी ३३ लाख लाभार्थी आहेत आणि त्यांना कमाल ९ सिलिंडरसाठी प्रति ...

July 31, 2025 7:15 PM July 31, 2025 7:15 PM

views 31

Cabinet Decision : छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी

केंद्रीय मंत्रिमंडळानं छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे. त्यासाठी सुमारे २ हजार २०० कोटी रुपये खर्च येणार आहे. याशिवाय इटारसी - नागपूर दरम्यान सुमारे साडे ५ हजार कोटी रुपये खर्च करुन चौथा रेल्वे मार्ग टाकला जाणार आहे. माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेसाठी सुमारे साडे ६ हजार कोटी रुपये आणि National Cooperative Development Corporation ला २ हजार कोटी रुपयांचा निधी देण्...

June 11, 2025 8:37 PM June 11, 2025 8:37 PM

views 4

Cabinet Decision : २ रेल्वे प्रकल्पांच्या दुपदरीकरणाला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज २ रेल्वे प्रकल्पांच्या दुपदरीकरणाला मंजुरी दिली. झारखंडमधला कोडर्मा - बारकाकाना आणि कर्नाटकातला बल्लारी ते आंध्र प्रदेशातला चिकजाजूर या मार्गांचा यात समावेश आहे, असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या दोन्ही प्रकल्पांसाठी सुमारे साडे ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या ३ वर्षात हे काम पूर्ण होईल, असं ते म्हणाले. 

June 10, 2025 3:13 PM June 10, 2025 3:13 PM

views 3

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यासंबंधीचं विधेयक अधिवेशनात मांडणार

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आयोगाला वैधानिक दर्जा देण्यासंबंधी विधेयक आगामी विधिमंडळ अधिवेशनात आणण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शासकीय भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात  ६ हजार २५० रुपयांची वाढ, पदव्युत्तर पदवी विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात १० हजार रुपयांची वाढ, तसंच बी.एस्‍सी. नर्सिंग अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात ८ हजार रुपयांची  वाढ करण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला.

May 13, 2025 7:29 PM May 13, 2025 7:29 PM

views 17

कृत्रिम वाळू धोरणाला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

नैसर्गिक वाळूच्या अतिउपशामुळे निर्माण होणाऱ्या पर्यावरणीय संकटांना आळा बसावा, तसंच बांधकाम क्षेत्राला पर्यायी आणि टिकाऊ साधन उपलब्ध व्हावं यासाठी राज्यात कृत्रिम वाळूचं उत्पादन आणि वापर धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याअंतर्गत प्रत्येक जिल्ह्यात ५० व्यक्ती किंवा संस्थांना कृत्रिम वाळू युनिट स्थापन करण्यासाठी उद्योग विभाग सवलती देणार आहे. तसंच या युनिट्सना २०० रुपये प्रति ब्रास इतकी सवल...