May 11, 2025 7:02 PM May 11, 2025 7:02 PM

views 2

CA परिक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर

देशाच्या सीमाभागात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंन्टट्स ऑफ इंडिया या संस्थेनं आपल्या पुढं ढकललेल्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक जाहीर केलं आहे. सीए फायनल, इंटरमिडिएट, पोस्ट क्वालिफिकेशन कोर्स आणि सेल्फ पेस्ड ऑनलाईन मोड्युल या परीक्षा आता १६ मेपासून सुरू होणार आहेत. सुधारित वेळापत्रकाचे तपशील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंन्टट्स ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले आहेत.