August 2, 2025 8:14 PM August 2, 2025 8:14 PM

views 1

भारताला सी-२९५ लष्करी वाहतूक विमानांमधली शेवटची १६ विमानं प्राप्त

भारताला सी-२९५ लष्करी वाहतूक विमानांमधली शेवटची १६ विमानं प्राप्त झाली असून त्यामुळे भारताची संरक्षण क्षमता आणखी मजबूत झाली आहे. स्पेनमध्ये सेव्हील इथं भारताचे राजदूत दिनेश पटनाईक आणि भारतीय हवाईदलाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे हस्तांतरण झालं. नियमित वेळापत्रकाच्या दोन महिने आधी विमानं प्राप्त झाली आहेत. भारत आणि स्पेनमध्ये झालेल्या करारानुसार एकूण ५६ विमानं भारताला  मिळणार आहेत.

October 28, 2024 2:54 PM October 28, 2024 2:54 PM

views 9

खाजगी क्षेत्रातल्या पहिल्या एरोस्पेस प्रकल्पाचं प्रधानमंत्री मोदी आणि स्पेनच्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गुजरातमधे वडोदरा इथं C-295 लष्करी विमानांच्या निर्मितीसाठी तयार करण्यात आलेल्या टाटा एअरक्राफ्ट संकुलाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्पेनचे प्रधानमंत्री पेद्रो सांचेझ यांच्या हस्ते आज झालं. टाटा एअरबस प्रकल्प हा मेक इन इंडिया उपक्रमांतर्गत लष्करी विमानांसाठीचा भारतातील पहिला खाजगी क्षेत्रातील एरोस्पेस प्रकल्प आहे.  भारत आणि स्पेनदरम्यान संरक्षणक्षेत्रातले संबंध या प्रकल्पामुळे अधिक दृढ होतील त्याचप्रमाणे मेक इन इंडियालाही बळ मिळेल असं प्रधानमंत्री मोदी यावेळी म्हणाले. भारत साऱ्या जगास...