March 17, 2025 3:54 PM March 17, 2025 3:54 PM

views 50

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस

राज्य विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरायचा आज शेवटचा दिवस आहे. भाजपकडून संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी यांनी आज आपले अर्ज दाखल केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनीही अर्ज भरला. तर अपक्ष उमेदवार उमेश म्हेत्रे यांनीही अर्ज दाखल केला आहे.   ही निवडणूक २७ मार्च रोजी होणार आहे आणि त्याचदिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होईल. आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं रिक्त झालेल्या जाग...

August 21, 2024 7:32 PM August 21, 2024 7:32 PM

views 15

भाजपाचे धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांची राज्यसभेवर निवड निश्चित

  भाजपाचे राज्यसभेसाठीचे उमेदवार धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नितीन पाटील यांचा बिनविरोध विजय निश्चित झाला आहे. देशभरात राज्यसभेच्या १२ जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. महाराष्ट्रातून खासदार पियुष गोयल आणि उदयनराजे भोसले लोकसभेवर निवडून गेल्यामुळे रिक्त झालेल्या दोन जागांवर पोटनिवडणूक होणार होती. यांच्या बिनविरोध निवडीमुळे केवळ औपचारिकता बाकी आहे. उदयनराजे भोसले यांच्या जागी राष्ट्रवादी काँग्रेसनं नितीन पाटील यांची उमेदवारी आजच घोषित केली, तर भाजपानं काल रायगडचे माजी आमदार धैर्यशी...