November 11, 2025 7:43 PM November 11, 2025 7:43 PM

views 27

ओडिशात नुआपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत 78.27 टक्के मतदान

ओडिशातील नुआपाडा विधानसभा पोटनिवडणुकीत सायंकाळी 5 वाजेपर्यंत 75 टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले. सकाळी 7 वाजता कडक बंदोबस्तात मतदानास सुरुवात झाली असून कोणतीही अप्रिय घटना घडलेली नाही.   माजी आमदार राजेंद्र धोलकिया यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. या मतदारसंघात भाजपचे जय धोलकिया, बीजेडीच्या स्नेहनागिनी छुरिया आणि काँग्रेसचे घासीराम माजी यांच्यात त्रिकोणी लढत आहे. मतमोजणी 14 नोव्हेंबर रोजी होणार आहे.