November 14, 2025 8:08 PM November 14, 2025 8:08 PM

views 53

विधानसभा पोटनिवडणुकीची मतमोजणी झाली

७ राज्यांमधल्या ८ विधानसभा मतदारसंघामधे झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणीही आज झाली. त्यात भाजपा आणि काँग्रेसनं  प्रत्येकी २, तर आम आदमी पार्टी, झारखंड मुक्तिमोर्चा मिझो नॅशनल फ्रंट आणि पिपल्स डेमाॅक्रेटिक पार्टी यांनी प्रत्येकी एक जागा जिंकली.    जम्मू कश्मीरमधल्या नागरोटा मतदारसंघात देवयानी राणा, तर  ओदिशातल्या नवपाडा मतदारसंघात जय ढोलकिया हे भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत.    तेलंगणात हैद्राबादमधल्या ज्युबेली हिल्स मतदारसंघातून नवीन यादव, तसंच, राजस्थानमधल्या अंता मतदारसंघात प्रमोद जै...

May 25, 2025 1:33 PM May 25, 2025 1:33 PM

views 26

पाच विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या मिळून पाच विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली. याविषयीची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. पुढच्या महिन्यात २ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, ३ जून रोजी त्यांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख ५ जून असून १९ जून रोजी मतदान तर २३ जून रोजी मतमोजणी होणार आहे.    गुजरातमध्ये २, तर उर्वरित राज्यांमधल्या प्रत्येकी एका मतदारसंघात पोटनिवडणूक घेण्यात येणार आहे. 

March 18, 2025 7:02 PM March 18, 2025 7:02 PM

views 37

विधानपरिषद पोटनिवडणुकीत पाचही उमेदवारांची बिनविरोध निवड

राज्य विधानपरिषदेच्या पाच जागांसाठीच्या पोटनिवडणुकीत एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद ठरला आहे. त्यामुळे भाजपाचे संजय केणेकर, दादाराव केचे आणि संदीप जोशी तर राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय खोडके आणि शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी या पाच उमेदवारांची निवड बिनविरोध होणार आहे.

March 16, 2025 8:13 PM March 16, 2025 8:13 PM

views 52

विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार जाहीर

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पाच जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी भाजपाने तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यात छत्रपती संभाजीनगर इथले संजय केणेकर, नागपूरमधले संदीप जोशी आणि वर्ध्यातले दादाराव केचे यांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर उमेदवार देणार आहे.   ही निवडणूक २७ मार्च रोजी होणार आहे आणि त्याचदिवशी संध्याकाळी ५ वाजता मतमोजणी होईल. आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांच्या रिक्त ज...

November 13, 2024 3:20 PM November 13, 2024 3:20 PM

views 12

देशातल्या १० राज्यातल्या ३१ विधानसभा मतदारसंघांमधे पोटनिवडणुकीसाठी मतदान

देशातल्या १० राज्यातल्या मिळून ३१ विधानसभा मतदारसंघांमधे पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. दुपारी १ वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची उपलब्ध झालेली राज्यनिहाय टक्केवारी अशी आहे. राजस्थानात - ५४ पूर्णांक ९५ शतांश टक्के. पश्चिम बंगाल - ४५ पूर्णांक ३७ शतांश टक्के. आसाम - ५० पूर्णांक १९ शतांश टक्के. बिहार - २७ पूर्णांक ८ दशांश टक्के. कर्नाटक - ४५ पूर्णांक ३ शतांश टक्के. मध्यप्रदेश - ५३ पूर्णांक १ शतांश टक्के. केरळ - ४४ पूर्णांक ३५ शतांश टक्के. छत्तीसगड - २८ पूर्णांक ३७ शतांश टक्के. गुजरात - ३९ पूर्णांक १...

November 12, 2024 3:34 PM November 12, 2024 3:34 PM

views 7

देशातल्या इतर राज्यातल्या विधानसभा आणि वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणुकीसाठी तयारी पूर्ण

देशातल्या इतर राज्यातल्या विधानसभा पोटनिवडणुकीसाठीच्या पाच, बिहारमधे विधानसभेच्या चार जागांसाठी तर केरळात लोकसभा आणि विधानसभेच्या प्रत्येकी एका जागेसाठी उद्या होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठीची तयारी पूर्ण झाली आहे.      आसाममधे ३४ उमेदवार रिंगणात असून ९ लाखाहून अधिक मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. त्यासाठी एक हजार मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. समागुरी मतदारसंघात अनेक हिंसक घटना झाल्याच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या निवडणुकीत सर्व जागांवर सत्तारूढ भाजपा, आसाम गण परिषद, युनायटेड पीप...

November 11, 2024 8:17 PM November 11, 2024 8:17 PM

views 16

११ राज्यांतल्या ३३ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि वायनाड लोकसभा मतदारसंघासाठीचा प्रचार संपला

११ राज्यांतल्या ३३ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आणि केरळमधल्या वायनाड लोकसभा मतदारसंघासाठी आज संध्याकाळी प्रचार संपला. राजस्थानात ७, पश्चिम बंगालमधे ६, आसाममधे ५, बिहारमधे ४, कर्नाटकात ३ आणि मध्य प्रदेश-सिक्कीममधे प्रत्येकी २ जागांसाठी पोटनिवडणूक होणार आहे. केरळ, छत्तीसगड, गुजरात, मेघालय मधे प्रत्येकी एका जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 

August 8, 2024 11:13 AM August 8, 2024 11:13 AM

views 15

राज्यसभेच्या १२ जागांच्या पोटनिवडणुकीसाठी ३ सप्टेंबरला मतदान

देशातल्या 9 राज्यांतल्या 12 जागांसाठी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम काल निवडणूक आयोगानं जाहीर केला. राज्यातल्या 2 जागांचा यात समावेश आहे. या पोटनिवडणुकीसाठी या महिन्याच्या 14 तारखेला अधिसूचना जारी होईल. 22 तारखेला अर्जांची छाननी होईल. 3 सप्टेंबरला मतदान होणार आहे. राज्यात खासदार उदयनराजे भोसले आणि पियुष गोयल लोकसभेवर निवडून गेल्यामुळे दोन जागांवर पोटनिवडणूक होणार आहे