June 19, 2025 8:01 PM June 19, 2025 8:01 PM

views 22

चार राज्यांमधल्या विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक

चार राज्यांमधल्या ५ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. त्यात संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत, गुजरातमधल्या विसवदर आणि  काडी या मतदारसंघांमधे ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. केरळमधल्या निलंबुर मतदारसंघात सुमारे ७० टक्के, पश्चिम बंगालमधल्या कालीगंज मतदारसंघात ६९ टक्के, तर पंजाबमधल्या लुधियाना मतदार संधात सुमारे ४९ टक्के, मतदान झालं.  या पाचही मतदारसंधांमधली मतमोजणी येत्या सोमवारी होणार आहे. 

November 26, 2024 7:55 PM November 26, 2024 7:55 PM

views 17

राज्यसभेच्या सहा जागांसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

राज्यसभेतल्या ६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम आज केंद्रीय निवडणूक आयोगानं जाहीर केला. यात आंध्र प्रदेशातल्या ३, तर ओदिशा, पश्चिम बंगाल, आणि हरियाणातल्या एका जागेचा समावेश आहे. आंध्रप्रदेशातले खासदार वेंकटरमण राव मोपीदेवी, बीडा मस्तान राव यादव, आणि ऋयागा  कृष्णय्या यांनी राजीनामे दिले. तसंच ओदिशातले सुजीतकुमार, पश्चिम बंगालमधले जवाहर सरकार आणि हरियाणातले कृषन लाल पंवार यांच्या राजीनाम्यामुळे या जागा रिक्त झाल्या आहेत.

July 19, 2024 7:48 PM July 19, 2024 7:48 PM

views 16

नागपूर जिल्हा परिषदेच्या १ आणि पंचायत समित्यांच्या ४ जागांसाठी ११ ऑगस्टला पोटनिवडणूक

नागपूर जिल्हा परिषदेच्या एका आणि विविध पंचायत समित्यांच्या चार जागांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या ११ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे, असं राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. २३ ते २९ जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येतील. ३० जुलै रोजी छाननी होईल. उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हाचं वाटप ५ ऑगस्टला होईल. ११ ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. मतमोजणी १२ ऑगस्टला होणार आहे.

July 10, 2024 1:34 PM July 10, 2024 1:34 PM

views 22

देशातल्या सात राज्यांमधल्या १३ विधानसभा मतदारसंघांमधे आज पोटनिवडणुकीसाठी मतदान

देशातल्या सात राज्यांमधल्या तेरा विधानसभा मतदारसंघांमधे आज पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू आहे. पश्चिम बंगालमधल्या रायगंज, राणाघाट दक्षिण, बागडा आणि मणिकतला, हिमाचल प्रदेशमधल्या देहरा, हमीरपूर आणि नालागढ तसंच उत्तराखंडमधल्या बद्रीनाथ आणि मंगलौर या मतदारसंघात मतदान होत आहे. तसंच मध्यमप्रदेशमध्ये अमरवाडा, बिहारमध्ये रुपौली, तमिळनाडूमध्ये विक्रवंडी आणि पंजाबमधल्या जालंधर पश्चिम मतदारसंघात मतदान सुरू आहे.