December 21, 2025 9:16 AM December 21, 2025 9:16 AM

views 7

BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला कांस्यपदक

बॅडमिंटनमध्ये, काल चीनमधील हांगझोऊ इथं झालेल्या BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 या स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं कास्यपदक मिळवलं. उपांत्य फेरीत त्यांना चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दुसऱ्यांदा पदकाची कामगिरी केली आहे. यापूर्वी 2018 मध्ये, पीव्ही सिंधूनं महिला एकेरीत सुवर्णपदक जिंकलं होतं.

August 26, 2025 2:12 PM August 26, 2025 2:12 PM

views 6

बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या लक्ष्य सेनचं आव्हान संपुष्टात

बीडब्ल्यूएफ बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतल्या पुरुष एकेरीतलं भारताच्या लक्ष्य सेनचं आव्हान काल संपुष्टात आलं.  जागतिक क्रमवारीत अव्वल असलेला चीनी खेळाडू शी यू ने लक्ष्य सेनचा २१-१७,२१-१९, असा पराभव केला.   ऋतुपर्णा आणि श्वेतपर्णा या पांडा भगिनींही पहिल्याच फेरीत पराभूत झाल्या. बुल्गारियाच्या गॅब्रिएला आणि स्टेफनी यांनी त्यांचा २१-१२, २१-११ असा पराभव केला.