March 19, 2025 7:27 PM March 19, 2025 7:27 PM

views 16

सुनिता विलियम्स आणि बुच विल्मोर यांची ‘ग्रह वापसी’

गेले नऊ महिने अंतराळ स्थानकात अडकून पडलेले अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आज पहाटे स्पेसएक्स क्रू ड्रॅगन स्पेसक्राफ्टमधून पृथ्वीवर परतले. त्यांचं स्पेसएक्स कॅप्सूल पॅराशूटच्या मदतीनं मेक्सिकोच्या आखातात टालाहासीच्या किनाऱ्याजवळ उतरलं. यासोबतच आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरचे नासाचे निक हेग आणि रशियन अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे अंतराळवीरही परत आले आहेत.   गेल्या जूनमध्ये केवळ ८ दिवसांच्या मोहिमेसाठी गेलेल्या, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना २८६ दिवस अंतराळात घालवावे ...

March 18, 2025 8:21 PM March 18, 2025 8:21 PM

views 10

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर पृथ्वीच्या दिशेने

अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे पृथ्वीच्या दिशेनं यायला निघाले आहेत. एकूण चार अंतराळवीरांना घेऊन येणारं ड्रॅगन हे यान आज सकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून वेगळं झालं. ताशी सुमारे २७ हजार किलोमीटर वेगानं ते पृथ्वीच्या वायूमंडळात प्रवेश करेल.   पृथ्वीपासून १८ हजार फूट उंचीवर आल्यावर दोन ड्रॅगन पॅराशूट उघडली जातील तर सहा हजार फुटांवर मुख्य पॅराशूट उघडली जातील. भारतीय प्रमाणवेळेनुसार उद्या पहाटे साडे तीनच्या सुमारास अंतराळवीर समुद्रात उतरण्याची अपेक्षा आहे.    पृथ्वीवर स...

March 17, 2025 10:14 AM March 17, 2025 10:14 AM

views 14

सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर उद्या पृथ्वीवर परतणार !

आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात ९ महिन्यांहून अधिक काळ अडकलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे दोन अंतराळवीर उद्या रात्री पृथ्वीवर परततील, अशी माहिती नासाने एका निवेदनाद्वारे दिली आहे. सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर, यांना आणखी एक अमेरिकन अंतराळवीर आणि एका रशियन अंतराळवीरासह स्पेसएक्स क्रू ड्रॅगन यानाद्वारे भुतलावर आणण्यात येईल. अमेरिकन अवकाश संस्था नासाचे अंतराळवीर निक हेग आणि रोसकॉसमॉस अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह देखील ड्रॅगन कॅप्सूलवर परततील. आठ दिवसाच्या अभियानासाठी गेलेल्या सुनिता वि...

March 15, 2025 2:51 PM March 15, 2025 2:51 PM

सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी ‘ड्रॅगन अंतराळ यान’ रवाना

गेल्या एक वर्षापासून अंतराळात अडकलेले नासाचे वैज्ञानिक सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना परत आणण्यासाठी ड्रॅगन अंतराळ यान घेऊन जाणारं फाल्कन ९ रॉकेट काल संध्याकाळी अंतराळात रवाना झालं. नासा आणि स्पेसएक्सच्या क्रू १० मिशन अंतर्गत हे यान काल अंतराळात निघालं.   सुनिता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या वर्षी जून महिन्यात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होेते, मात्र अंतराळ यानात तांत्रिक बिघाड झाल्यानं त्यांना परतता आलं नाही. त्यांना परत आणण्यासाठी नासा प्रयत्न करत आहे. सर्व काही ठरल्याप्रम...