September 23, 2024 3:04 PM September 23, 2024 3:04 PM

views 11

अमरावतीत खासगी बस नदीत कोसळून झालेल्या अपघातात ४ ठार, २५ जखमी

अमरावती जिल्ह्यात मेळघाटातल्या सेमाडोह परिसरात आज खासगी बस पुलावरून नदीत कोसळून झालेल्या अपघातात ४ जण ठार तर २५ जण जखमी झाले. यापैकी ७ जणांची प्रकृती गंभीर आहे. ही बस अमरावतीहून धारणीच्या दिशेने प्रवास करत होती. चालकाचं नियंत्रण सुटल्याने बस पुलावरून नदीत कोसळल्याची माहिती मिळत आहे. बसमधले अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले असून व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी आणि पोलीस पथक मदतकार्य करत आहेत.

September 21, 2024 11:25 AM September 21, 2024 11:25 AM

views 19

जालना जिल्ह्यात रस्ते अपघातात सहा जणांचा मृत्यू

जालना जिल्ह्यात शहापूर गावाजवळ काल झालेल्या बस आणि ट्रकच्या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 23 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बस आणि ट्रकच्या चालकांसह 3 प्रवाशांचा समावेश आहे. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार केले जात आहेत.

July 16, 2024 7:08 PM July 16, 2024 7:08 PM

views 17

मुंबई- पुणे महामार्गावर बस अपघातात ५ जणांचा मृत्यू

मुंबई- पुणे महामार्गावर आज सकाळी झालेल्या बस अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या ४५ प्रवाशांना कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी ७ जणांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीहून पंढरपूरला जाणारी बस ट्रॅक्टरला धडकून दरीत कोसळली.   मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कळंबोलीतल्या एमजीएम रूग्णालयात भेट देऊन रूग्णांची चौकशी केली. सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत, तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार कर...