September 12, 2025 2:53 PM September 12, 2025 2:53 PM

views 14

लखनऊ इथं बस उलटून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू

उत्तर प्रदेशात लखनऊ इथं काकोरी भागात बस उलटून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून १०पेक्षा अधिक जण जखमी झाले. काल रात्री हरदोईवरून येणारी बस काकोरी भागात पाण्याच्या टँकरला धडकली आणि रस्त्याशेजारच्या २० फूट खोल खड्ड्यात पडली, आणि हा अपघात झाला.

July 29, 2025 2:46 PM July 29, 2025 2:46 PM

views 11

धुळ्यात एसटी बसला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू , २२  जण जखमी

महाराष्ट्रातल्या धुळे जिल्ह्यात शिरपूर तालुक्यात मुंबई-आग्रा महामार्गावरच्या दभाषी फाटा येथे आज सकाळी एका एसटी बसला झालेल्या अपघातात एका शाळकरी मुलीचा मृत्यू झाला असून २२  जण जखमी झाले. शिरपूरला हून शिंदखेडा जाणाऱ्या या एसटीला एका ट्रकने पाठीमागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमी प्रवाशांना शिरपूरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यातल्या ४ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना धुळे इथल्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

July 25, 2025 1:07 PM July 25, 2025 1:07 PM

views 12

Himachal Pradesh : बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू, २१ जण जखमी

हिमाचल प्रदेशात काल मंडी जिल्ह्यातील तरंगलाजवळ एक बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू झाला, तर २१ जण जखमी झाले. राज्य रस्ते वाहतूक महामंडळाची ही बस सरकाघाटहून दुर्गापूरला जात होती.  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांबद्दल शोक व्यक्त केला आहे. त्यांनी मृतांच्या कुटुंबांना प्रधानमंत्री मदत निधीतून प्रत्येकी २ लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

May 30, 2025 1:15 PM May 30, 2025 1:15 PM

views 5

उत्तर प्रदेशात बस अपघातात ४ जणांचा मृत्यू, १५ जखमी

उत्तर प्रदेशातल्या जौनपूर जिल्ह्यात आज सकाळी बादलपूरहून जौनपूरला जाणारी एक खाजगी बस उलटल्यानं किमान चार जणांचा मृत्यू आणि १५ जण जखमी झाले आहेत. पोलिस अधीक्षक डॉ. कौस्तुभ यांनी यांनी ही माहिती दिली. प्रत्यक्षदर्शींच्या मते, बस सुमारे ८० किमी प्रतितास वेगाने धावत होती. तेव्हा चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला. काही प्रवाशांनी बाहेर पडण्यासाठी खिडक्यांच्या काचा फोडल्या, तर काही जण आतच अडकले, असं बचाव कार्यात मदत करणाऱ्या एका स्थानिक रहिवाशानं सांगितलं.

February 2, 2025 3:41 PM February 2, 2025 3:41 PM

views 5

गुजरातमधे सापुतारा घाटात झालेल्या बस अपघातात 5 जणांचा मृत्यू , 17 जण जखमी

गुजरातच्या डांग जिल्ह्यात सापुतारा घाटात दोनशे फूट दरीत बस कोसळून आज झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला, तर १७ जण जखमी झाले आहेत. ही बस भाविकांना घेऊन महाराष्ट्रातल्या त्र्यंबकेश्वर इथून गुजरातमधल्या द्वारका इथं जात होती. सर्व भाविक मध्यप्रदेशातले रहिवासी आहेत. जखमी  प्रवाशांना अहवा इथल्या रुग्णालयात दाखल केल्याचं पोलिसांनी सांगितलं.   

January 25, 2025 7:17 PM January 25, 2025 7:17 PM

views 7

यवतमाळ जिल्ह्यातील बस अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू

यवतमाळ जिल्ह्यातल्या उमरखेड इथं शाळेची बस झाडावर आदळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला आहे. यात काही विद्यार्थी जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.   बसमध्ये क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवले जातात का हे तपासा आणि दोषींवर कठोर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले आहेत.

January 6, 2025 12:58 PM January 6, 2025 12:58 PM

views 13

केरळमध्ये बस दरीत कोसळून ६ जणांचा मृत्यू

केरळच्या इडुक्की जिल्ह्यात पुल्लूपाडा इथं राज्य मार्ग परिवहन महामंडळाची बस चालकाचं नियंत्रण सुटल्यानं दरीत कोसळून अपघात झाला. यात दोन महिलांसह चौघांचा मृत्यू झाला आहे. जखमी झालेल्यांना मुंडक्कयम इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ब्रेक निकामी झाल्यानं हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. यात तामिळनाडूहून तंजावरच्या सहलीवरून परतत असलेले प्रवासी होते.

December 24, 2024 6:57 PM December 24, 2024 6:57 PM

views 8

जालन्यात जाफ्राबाद-चिखली मार्गावर प्रवासी बसला अपघात, १५ जखमी

जालनातल्या जाफ्राबाद-चिखली मार्गावर आज सकाळी प्रवासी वाहतूक करणारी एक बस वीस फुट खड्डयात  कोसळून अपघात झाला. या अपघातात चालक आणि वाहकासह १५ प्रवासी जखमी झाले. तीन प्रवाशांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  चिखली आगाराची ही बस कोळेगाव घाट चढत असताना अचानक स्टेअरिंगचा रॉड तुटल्यानंतर चालकाचं  बसवरचं  नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाला.

December 6, 2024 8:12 PM December 6, 2024 8:12 PM

views 11

उत्तरप्रदेशात बस अपघातात ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी

उत्तरप्रदेशात कनोज जिल्ह्यात आज झालेल्या एका बस अपघातात ८ जण मरण पावले असून १८ जण गंभीर जखमी झाले आहेत. आग्रा लखनौ महामार्गावर कडेला उभ्या असलेल्या ट्रकला बसने धडक दिल्यामुळे ती उलटली . जखमींना सैफई रुग्णालयात दाखल केलं आहे. जलशक्ती राज्यमंत्री स्वतंत्र देव सिंग यांनी अपघातस्थळी पोचून मदत कार्याची देखरेख केली . प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपये  तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांचं अर्...

October 29, 2024 7:43 PM October 29, 2024 7:43 PM

views 9

जम्मू-काश्मीरमधे बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३० जण जखमी

जम्मू-काश्मीरमधे उधमपूर जिल्ह्यात एक खासगी प्रवासी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात ३० जण जखमी झाले. जखमींमध्ये परिचारिका महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असल्याचं स्थानिक पोलिसांनी कळवलं आहे. ही बस सलमारीहून उधमपूरला जात असताना, फरमा गावाजवळ रस्तावरून घसरून दरीत कोसळली. या घटनेबद्दल माहिती मिळताच प्रशासनाकडून तातडीने बचावकार्य सुरू केलं गेलं. सर्व जखमींना उधमपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून, जखमींपैकी तिघांची प्रकृती गंभीर असल्याचंही पोलिसांनी सांगितलं.