January 24, 2026 7:28 PM
5
शेगाव रेल्वे स्थानकावर केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते रेल्वे कोच कॅन्टीनचं उद्धाटन
बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव रेल्वे स्थानकावर आज केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते रेल्वे कोच कॅन्टीनचं उद्धाटन झालं. या उपाहारगृहात संत गजानन महाराज यांचं समाधीस्थळ, पंढरपूरचा विठुराया यांच्यसह वंदे भारत रेल्वे आणि भारताची सांस्कृतिक समृद्धी प्रदर्शित करणारी चित्रं रंगवण्यात आल्यानं ते पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. हे अनोखं उपाहारगृह प्रवाश्यांच्या सोयीसाठी २४ तास खुलं राहणार आहे.