November 4, 2025 3:01 PM November 4, 2025 3:01 PM

views 74

बुलढाण्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा

बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पाच लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जिल्हा प्रशासनानं सुमारे ३०० कोटी पेक्षा जास्त मदत निधी जमा केल्याची माहिती जिल्ह्यधिकाऱ्यांनी दिली आहे. याशिवाय,  २०२४-२५ मधल्या रखडलेल्या पीक विम्याचे सुमारे १२१ कोटी रुपये ६३ हजारांहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आले  आहेत, असंही त्यांनी सांगितलं.     ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात त्रुटी आहेत किंवा ज्यांनी  शेतकरी ओळखपत्र काढलेलं नाही अशांना ही नुकसान भरपाई मिळावी यासाठी प्रशासन काम करत ...

April 2, 2025 7:45 PM April 2, 2025 7:45 PM

views 5

बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघातात ६ जण ठार

बुलढाणा जिल्ह्यात खामगाव शहरालगतच्या शेगाव मार्गावर आज पहाटे तीन वाहनं एकमेकांवर आदळल्यानं झालेल्या अपघातात ६ जण जागीच ठार तर २६ जण जखमी झाले आहेत. खासगी बसला ओव्हरटेक करणाऱ्या  बोलेरो कारला समोरून एसटी बस आणि मागून खासगी बसची धडक बसल्यानं हा अपघात घडला.

March 8, 2025 3:28 PM March 8, 2025 3:28 PM

views 6

बुलडाणा समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, दहा जण जखमी

मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. यवतमाळहून शिर्डीला जाणाऱ्या भाविकांच्या चारचाकीचं टायर फुटल्यानं ती मागून येणाऱ्या कारला धडकली. यात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी पोहोचलं होतं. या अपघातामुळे मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावरली वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.

February 8, 2025 7:41 PM February 8, 2025 7:41 PM

views 2

बुलडाणा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ३ ठार तर १ गंभीर जखमी

बुलडाणा जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या अपघातात ३ जण ठार तर १ जण गंभीर जखमी झाले आहेत. मलकापूर जवळ उमाळी इथं दुचाकीची समोरासमोर धडक होऊन २ जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. दुसऱ्या अपघातात खामगाव नजीक टेंभुर्णा इथं अज्ञात वाहनाने मागून धडक दिल्याने दुचाकीवरच्या इसमाचा मृत्यू झाला.

January 12, 2025 4:02 PM January 12, 2025 4:02 PM

views 6

राजमाता जिजाऊंच्या जयंतिनिमित्त राज्यभरात उत्साहात साजरी

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री-राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. जिजाऊंच्या जयंती सोहळ्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सूर्योदयावेळी शासकीय महापूजा करण्यात आली. केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पूजा झाली. यावेळी राजे लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव उपस्थित होते.   बीड ...

January 9, 2025 7:35 PM January 9, 2025 7:35 PM

views 15

बुलढाण्यात केस गळतीचं प्रमाण वाढलं, नागरिक हैराण

बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यात पूर्णा नदीकाठच्या विविध गावांमध्ये केस गळतीचे प्रमाण अचानक मोठ्या प्रमाणावर वाढलं असल्याबाबत आरोग्य विभागाने त्वचारोग तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केलं आहे. आतापर्यंत ५१ नागरिकांचे डोक्यावरचे केस पूर्णपणे गळून गेल्याचं आढळलं असून रुग्णांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत. वापरात आलेल्या पाण्यामध्ये अचानक नायट्रेटचं प्रमाण अधिक असल्यामुळे केस गळतीचं प्रमाण वाढल्याचं एका निष्कर्षातून समोर आल्याचे आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

December 26, 2024 3:20 PM December 26, 2024 3:20 PM

views 10

निर्यात क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अव्वल

एप्रिल ते आक्टोबर २०२४ च्या कालावधीत निर्यात क्षेत्रात अमरावती विभागात बुलढाणा जिल्हा अव्वल ठरला आहे यंदाच्या या काळात बुलढाणा जिल्ह्यात ४६५ कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या उत्पादनाची निर्यात झाली आहे. जिल्ह्यातून सेंद्रिय रसायने रासायनिक उत्पादने साबण अभियांत्रिक उत्पादने तृणधान्य, दागिने,सोयाबीन, संबंधित उत्पन्न बियाणे भाज्या,आणि कापूस, आणि गाठींची निर्यात होते

December 21, 2024 6:41 PM December 21, 2024 6:41 PM

views 9

बुलडाणा जिल्ह्यात सुमारे २४ लाख ३३ हजार रुपये किंमतीचा अवैध औषधसाठा जप्त

अन्न  औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज बुलडाणा जिल्ह्यातल्या  लोणार इथल्या  चंदन मेडीकोज या औषध विक्रेत्याने दडवून ठेवलेल्या  सुमारे २४ लाख ३३ हजार रुपये किमतीचा अवैध औषधांचा साठा जप्त केला. या साठ्यामध्ये कामोत्तेजक औषधांचाही समावेश असल्याचं उघड झालं आहे. औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी या अवैध औषध साठ्यातल्या काही औषधांचे नमुने घेतले  असून त्याबाबतचा अधिक तपास सुरु आहे. संबंधित औषध विक्रेत्यानं  अनेक नियमांचं उल्लंघन केलं असल्यानं त्याच्यावर १९४० च्या औषधे आणि  सौंदर्य प्रसाधने कायद्यांततर्गत का...

December 6, 2024 7:32 PM December 6, 2024 7:32 PM

views 2

बुलढाण्यात ‘प्रकृती परीक्षण’ या उपक्रमाची सुरुवात

बुलढाणा जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्यासंदर्भातल्या ‘प्रकृती परीक्षण’ या उपक्रमाची कालपासून सुरुवात झाली आहे. केंद्रीय आयुष मंत्रालयातर्फे देशभरात सुरु झालेल्या ‘देश का प्रकृती परीक्षण’ या उपक्रमाअंतर्गत आयुर्वेदानुसार नागरिकांची प्रकृती कोणत्या प्रकारची आहे याचं  अनुमान काढलं जात. त्यासाठी आयुष मंत्रालयाने ‘प्रकृती परीक्षण’ नावाचं ऍप विकसित केलं आहे. जिल्ह्यातील नागरीकांनी या ॲपचा वापर करुन मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने सहभाग नोंदवावा, असे आवाहन करण्यात आल आहे.

December 5, 2024 7:13 PM December 5, 2024 7:13 PM

views 14

राज्यात काही ठिकाणी पावसाची हजेरी

बुलढाणा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे थंडीचा कडाका कमी झाला आहे. आज मात्र पावसानं हजेरी लावल्यानं पुन्हा गारवा वाढला आहे. थंडीतला पाऊस आरोग्याच्या दृष्टीने हानीकारक असल्यानं नागरिकांनी काळजी घ्यावी, असं आवाहन जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्यानी केलं आहे.  सांगली जिल्ह्यातल्या मिरज इथंही आज संध्याकाळी  जोरदार पाऊस झाला.