September 30, 2025 7:41 PM September 30, 2025 7:41 PM
19
व्हिएतनाममधल्या ‘बुआलोई’ चक्रीवादळात २६ जणांचा मृत्यू, तर २२ बेपत्ता
व्हिएतनाममधल्या ‘बुआलोई’ चक्रीवादळात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २६ वर पोहोचली असून, २२ जण अद्याप बेपत्ता आहेत. वादळाबरोबर झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत पूर आला असून, विमान आणि रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये व्हिएतनामच्या अनेक भागात ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याचं व्हिएतनामच्या राष्ट्रीय हवामान संस्थेनं म्हटलं आहे. व्हिएतनामचे प्रधानमंत्री फाम मिन चिन यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.