May 20, 2025 8:32 PM May 20, 2025 8:32 PM
11
कल्याणमध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू
कल्याणमध्ये एका रहिवासी इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका लहान मुलासह सहा जणांचा मृत्यू झाला, तर पाच जणांना वाचवण्यात यश आलं. दुपारी तीनच्या सुमाराला या इमारतीच्या चौथ्या मजल्याचा स्लॅब कोसळून ही दुर्घटना घडल्याची माहिती कल्याणचे उपविभागीय अधिकारी विश्वास गुजर यांनी दिली. यात ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एकंदर ११ जणांपैकी पाच जणांना अग्निशमन दलानं बाहेर काढलं, तर सहा जण दगावल्याचं त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं. मृतांच्या कुटुंबीयांन...