February 1, 2025 2:00 PM February 1, 2025 2:00 PM
7
आकांक्षित जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेची घोषणा
देशभरातल्या शंभर आकांक्षित जिल्ह्यांमध्ये राज्यांच्या सहकार्याने प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजना राबवणार असल्याचं अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्प मांडताना लोकसभेत सांगितलं. उत्पादन वाढवणं, शाश्वत शेती पद्धतीचा अवलंब करणं, पंचायत आणि गट स्तरावर साठवणुकीची क्षमता वाढवणं, सिंचन सुविधा सुधारणं, दीर्घकालीन आणि अल्पकालीन कर्ज उपलब्ध करून देणं हे याचं उद्दिष्ट आहे. याचा लाभ दीड कोटीपेक्षा जास्त शेतकऱ्यांना होणार आहे. किसान क्रेडिट कार्डद्वारे साडे सात कोटींपेक्षा जास्त शेतकरी, मच्छिमार आणि दूध उत्पादक शेतकऱ...