July 29, 2024 4:58 PM

views 31

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावर चर्चा

संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आज केंद्रीय अर्थसंकल्पावरची चर्चा पुढे सुरू आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी २३ जुलै रोजी अर्थसंकल्प सादर केला होता. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. देशात नोकऱ्यांची कमतरता नसून सरकारच्या विविध धोरणात्मक पावलांमुळे देशातला बेरोजगारीचा दर ३ पूर्णांक २ दशांश टक्क्यांपर्यंत खाली आल्याचं प्रतिपादन कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज लोकसभेत केलं. प्रश्नोत्तराच्या तासाला पुरवणी प्रश्नांना ते उत्तर देत होते. येत्या...

July 26, 2024 1:35 PM

views 15

संसदेत आज अर्थसंकल्पावर चर्चा सुरू

संसदेच्या दोन्ही सभागृहात आज कामकाजाची सुरुवात कारगिलमधल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून झाली. त्यानंतर दोन्ही सभागृहात प्रश्नोत्तराचा तास झाला. त्यानंतर म्हैसूर शहरी विकास प्राधिकरणातल्या कथित भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनी निषेध व्यक्त केला.   कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या राजीनाम्याची मागणी त्यांनी केली. त्यामुळं झालेल्या गदारोळामुळं लोकसभेचं कामकाज काही काळासाठी तहकूब झालं होतं. सध्या लोकसभा आणि राज्यसभेत अर्थसंकल्पावर चर्चा सुरू आहे.

July 23, 2024 8:51 PM

views 22

अर्थसंकल्प २०२४ : नवीन आयकर प्रणाली अंतर्गत वाढीव करसवलती

नवीन आयकर प्रणालीचा स्वीकार करणाऱ्यांसाठी आणखी कर सवलतींचा लाभ देण्याची घोषणा सीतारामन यांनी आजच्या अर्थसंकल्पात केली. अतिरीक्त १ लाख रुपयांच्या उत्पन्नाला त्यांनी विद्यमान दरापेक्षा कमी कर लादण्याची घोषणा केली. त्यामुळं पगारदारांना आता साडे १७ हजार रुपये कमी आयकर भरावा लागेल. नवीन कर प्रणालीत आता ३ लाख रुपयांपर्यंत काहीही कर द्यावा लागणार नाही. ३ ते ७ लाख दरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना ५ टक्के, ७ ते १० लाख दरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना १० टक्के, १० ते १२ लाख दरम्यान उत्पन्न असणाऱ्यांना १५ टक्के, १२ ...

July 22, 2024 8:09 PM

views 31

लोकसभेत अर्थसंकल्प सादर झाल्यावर उद्या एक तासानंतर कामकाजाला सुरुवात होणार

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यसभेचं कामकाज प्रश्नोत्तराच्या तासानंतर आज दिवसभरासाठी स्थगित झालं. लोकसभेत उद्या अर्थसंकल्प सादर झाल्यावर  एक तासानंतर कामकाजाला सुरुवात होईल.  राज्यसभेच्या कामकाजाला प्रश्नोत्तराच्या तासानं सुरुवात झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी हे कामकाज सुरळीत चालवण्यासाठी सदस्यांनी खबरदारी घ्यावी आणि जनतेच्या हितासाठी सर्वांनी एकजुटीनं काम करावं असं आवाहन केलं. केंद्र सरकारच्या हर घर जल योजना या उपक्रमाअंतर्गंत गेल्या पाच वर्षांत ग्रामीण भागातील ११ कोटी ७५ ला...