March 5, 2025 3:15 PM March 5, 2025 3:15 PM

views 3

भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाईचे निर्देश

राज्यातल्या विविध सरकारी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयात भेसळयुक्त औषधांचा पुरवठा केल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल असं सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितलं. मात्र संबंधित दोषी अधिकाऱ्यांचं निलंबन करण्याची आग्रही मागणी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केली. सरकारनं निलंबन करण्याचं आश्वासन न दिल्यामुळे विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला.

March 5, 2025 3:11 PM March 5, 2025 3:11 PM

views 4

कैलास बोऱ्हाडे युवकाला मारहाण करणाऱ्यांवर मकोका लावण्याचं उपमुख्यमंत्र्याचं आश्वासन

जालना जिल्ह्यात कैलास बोऱ्हाडे या युवकाला मारहाण करणाऱ्यांवर मकोका लावण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधान परिषदेत दिलं. याप्रकरणी जालन्याच्या पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून सर्व गुन्हेगारांना अटक करण्याचे निर्देश दिले आहेत. लवकरच पालकमंत्री तिथे भेट देतील, असं शिंदे म्हणाले.   राज्यात ओबीसी समाजातल्या विद्यार्थ्यांसाठी घोषित करण्यात आलेल्या ७२ पैकी ५४ वसतिगृह वर्षभरातच कार्यान्वित झाली असून उर्वरित वसतिगृह लवकरच सुरू होतील, अशी माहिती इतर मागासवर्ग कल्याण मंत्री अतुल सावे यांनी आज...