February 13, 2025 8:28 PM February 13, 2025 8:28 PM

views 10

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या सत्राची सांगता

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा संपल्यामुळे संसदेची दोन्ही सभागृह आज येत्या १० मार्च पर्यंत स्थगित करण्यात आली.  गेल्या महिन्यात ३१ जानेवारी रोजी  अधिवेशनाचा पहिला टप्पा सुरू झाला होता. अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात ११२ टक्के उत्पादकता नोंदवली गेल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सांगितलं. राष्ट्रपतींनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला दिलेल्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेत १७७ सदस्यांनी १७ तासांहून अधिक काळ भाग घेतला, तर २०२५-२६ च्या सर्वसाधारण अर्थसंकल्पावरच्या  चर्चेत...

January 28, 2025 8:07 PM January 28, 2025 8:07 PM

views 17

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर येत्या गुरुवारी सर्वपक्षीय बैठक

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या गुरुवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या शुक्रवारी सुरु होणार आहे. शनिवारी १ फेब्रुवारीला, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत सादर करतील. 

July 21, 2024 11:18 AM July 21, 2024 11:18 AM

views 14

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला केंद्रात आज सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात होत आहे. यानिमित्तानं केंद्र सरकारनं आज सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. दोन्ही सदनांचं कामकाज या अधिवेशन काळात सुरळीत होण्यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करावं, असं आवाहन या बैठकीत करण्यात येणार आहे. हे अधिवेशन 12 ऑगस्टपर्यंत चालणार असून, मंगळवारी 23 तारखेला केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात येईल.  

July 17, 2024 9:48 AM July 17, 2024 9:48 AM

views 7

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.23 जुलै रोजी अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.या अधिवेशानाचं कामकाज 12 ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे.

July 16, 2024 7:59 PM July 16, 2024 7:59 PM

views 13

सदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारतर्फे येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत व्हावं यासाठी सत्ताधारी विरोधी पक्षांकडून या बैठकीत सहकार्य मागणार आहेत. येत्या २२ तारखेपासून हे अधिवेशन सुरू होणार आहे. १२ ऑगस्टला त्याची सांगता होईल. २३ जुलै रोजी अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प मांडतील. तिसऱ्या वेळी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे.