March 3, 2025 6:45 PM March 3, 2025 6:45 PM

views 17

६ हजार ४८६ कोटी २० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या दोन्ही सभागृहात सादर

राज्य सरकारनं अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ६ हजार ४८६ कोटी २० लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या आज दोन्ही सभागृहात सादर केल्या. विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मागण्या मांडल्या. त्यात सर्वाधिक ३ हजार कोटी रुपयांहून अधिक मागण्या ग्रामविकास विभागाच्या आहे. प्रधानमंत्री आवासन योजनेसाठी पावणे ४ हजार कोटी आणि मुख्यमंत्री बळीराजा वीज दर सवलत योजनेसाठी २ हजार कोटी रुपयांची तरतूद यात आहे. या मागण्यांवर ६ आणि ७ मार्च रोजी चर्चा आणि मतदान होणार आहे.    विधानसभेत अध्यक्ष राहुल नार्व...

February 17, 2025 8:35 PM February 17, 2025 8:35 PM

views 8

राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३ मार्चपासून, १० मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

अर्थमंत्री अजित पवार राज्याचा अर्थसंकल्प १० मार्च रोजी सादर करणार आहेत. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला ३ मार्चपासून सुरुवात  होणार आहे. पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहासमोर राज्यपालांचं अभिभाषण होईल.

January 31, 2025 3:20 PM January 31, 2025 3:20 PM

views 5

राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला प्रारंभ

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानं आज सकाळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा  प्रारंभ झाला. त्यानंतर दोन्ही सदनांचं कामकाज सुरु झालं.    लोकसभेत सभापती ओम बिर्ला यांनी देशाच्या विकासात माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग यांनी दिलेल्या योगदानावर प्रकाश टाकला. तसंच मनमोहन सिंग, ओमप्रकाश चौटाला आणि ३ माजी खासदारांना आदरांजली वाहिली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी २०२४-२५ चा आर्थिक सर्वेक्षण अहवाल सदनात सादर केला. त्यानंतर सदनाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं.    राज्यसभेतही...

January 31, 2025 3:14 PM January 31, 2025 3:14 PM

views 15

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचं राष्ट्रपतींचं आवाहन

देशाला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्यासाठी महात्मा गांधी आणि सरदार पटेल यांच्यासारख्या थोर नेत्यांनी दिलेली एकतेची शपथ आठवून आणि देश संरक्षणात प्राणाची आहुती देणाऱ्या शहिदांकडून प्रेरणा घेऊन  सर्व नागरिकांनी योगदान द्यावं असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. त्या आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सुरुवातीला संसदेच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करत होत्या.   सरकारनं गेल्या १० वर्षात विकास आणि प्रगतीची नवी शिखरं गाठली आहेत, असं त्या म्हणाल्या. शेतकरी, युवक आणि गरिबांच्या हिताला सरकारन...

January 31, 2025 1:46 PM January 31, 2025 1:46 PM

views 9

स्वातंत्र्यप्राप्तीच्या शतकपूर्तीपर्यंत देश विकसित भारताचा संकल्प पूर्ण करेल – प्रधानमंत्री

देशातल्या मतदारांनी आपल्या सरकारवर तिसऱ्यांदा विश्वास व्यक्त केला असून यावेळचा अर्थसंकल्प या कार्यकाळातला पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. दिल्लीमध्ये आज संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होण्यापूर्वी  प्रसारमाध्यमांना ते संबोधित करत होते. भारताने लोकशाही राष्ट्र म्हणून ७५ वर्ष पूर्ण केली असून वर्ष २०४७ मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करेल, तेव्हा देश विकसित भारताचा संकल्प पूर्ण करेल, असा विश्वास  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी यावेळी ...