June 27, 2025 10:03 AM June 27, 2025 10:03 AM

views 11

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु होणार आहे. याच कामकाज 18 जुलैपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काल ही घोषणा करण्यात आली.  

March 28, 2025 6:19 PM March 28, 2025 6:19 PM

views 8

LokSabha : समुद्रमार्गे मालवाहतूक विधेयक २०२५ मंजूर

लोकसभेने आज समुद्रमार्गे मालवाहतूक विधेयक २०२५ मंजूर केलं. हे विधेयक १९२५ साली केलेल्या समुद्रमार्गे मालवाहतूक कायद्याची जागा घेणार असून त्यात मालवाहू जहाज कंपन्यांचे  हक्क आणि  जबाबदाऱ्या नोंदवलेल्या आहेत. या कायद्यातल्या बिल ऑफ लेडिंग सहित इतर अनेक नियमांची अंमलबजावणी करण्याचे अधिकार केंद्र सरकारच्या अखत्यारीत दिले आहेत.    जुन्या कायद्यामध्ये कालानुरूप बदल घडवण्याचे काम या नव्या कायद्यामुळे होत आहे, असं केंद्रीय बंदरे,नौवहन आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी सांगितलं. 

March 27, 2025 8:46 PM March 27, 2025 8:46 PM

views 13

वित्तविधेयक २०२५ आणि विनियोजन विधेयक २०२५ लोकसभेत मंजूर

वित्तविधेयक २०२५ आणि विनियोजन विधेयक २०२५ चर्चा करुन राज्यसभेनं आज लोकसभेला पाठवलं. लोकसभेत आधीच या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी चर्चेला प्रारंभ केला. अन्न, शिक्षण आणि आरोग्यक्षेत्रात महागाई झाली असून  बेरोजगारी वाढत आहे असं ते आपल्या भाषणात म्हणाले. तृणमूल काँग्रेसच्या सागरिका घोष म्हणाल्या, की गरीबांची क्रयशक्ती आणि खासगी गुंतवणूक घसरत आहे. करआकारणी जास्त होत असल्याने भारतात उपभोगाचं प्रमाण कमी झाल्याचा दावा आपचे राघव चढ्ढा यांनी केला. केंद्र सरकारने ल...

March 17, 2025 1:26 PM March 17, 2025 1:26 PM

views 11

कापूस खरेदी पारदर्शक होण्यासाठी राज्यशासन प्रयत्नशील – मंत्री जयकुमार रावल

भारतीय कापूस महामंडळामार्फत सुरू असलेली कापूस खरेदी पारदर्शकपणे व्हावी यासाठी राज्यशासन प्रयत्नशील असून आत्तापर्यंत राज्यात १२४ केंद्रांमार्फत १४२ कोटी ६९ लाख क्विंटल इतकी कापूस खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी या संदर्भातल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली.   या संदर्भातील प्रश्न अमित झनक यांनी उपस्थित केला होता. कापसाच्या खरेदीसाठी भावांतर योजना लागू करावी असा आग्रह विरोधी पक्षाच्या सदस्यांनी धरला होता. खुल्या बाजारातले व्यापारी देखील या केंद्रामधून कापूस खरेदी कर...

March 17, 2025 3:25 PM March 17, 2025 3:25 PM

views 9

‘विकसित भारत, विकसित महाराष्ट्र’ हा अर्थसंकल्पाचा मूळ गाभा – अर्थमंत्री

विकसित भारत विकसित महाराष्ट्र हे उद्दिष्ट साध्य करण्याच्या दिशेने आगामी ५ वर्षांचा विचार करून यंदाचा अर्थ संकल्प सादर केला आहे. शेती, उद्योग, पायाभूत सुविधा, रोजगार आणि सर्व घटकांचा विकास डोळ्यासमोर ठेवले आहे, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं. अर्थसंकल्पावरील चर्चेला ते विधानसभेत उत्तर देत होते.    राज्याच्या आणि विविध समाज घटकांच्या हिताच्या योजना बंद करणार नाही. पण गरज संपलेल्या, द्विरुक्ती असलेल्या योजना सरकार बंद करेल. त्यासाठी निधी दिलेला नाही, असे त्यांन...

March 10, 2025 2:09 PM March 10, 2025 2:09 PM

views 17

राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज सादर होणार

राज्याचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये सादर होणार आहे. महायुती सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतरचा हा पहिलाच अर्थसंकल्प असून अर्थमंत्री अजित पवार यांचा ११वा अर्थसंकल्प आहे. ते आधी विधानसभेत आणि त्यानंतर विधानपरिषदेत सादर करतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम वाढवण्यासह काही महत्त्वाच्या घोषणा या अर्थसंकल्पात होण्याची अपेक्षा आहे

March 10, 2025 1:08 PM March 10, 2025 1:08 PM

views 12

विधानसभेत भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव संमत

महाराष्ट्र विधानसभेत आयसीसी चँपियन्स ट्राफी २०२५ मध्ये अजिंक्य पद पटकाविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. तो एकमताने संमत करण्यात आला. प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह संघातल्या सर्व खेळाडूंचं सभागृहाने  अभिनंदन केलं.

March 6, 2025 3:21 PM March 6, 2025 3:21 PM

views 20

शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक

महाराष्ट्रात धान आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी सरकार सकारात्मक असून मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेतला जाईल, असं कृषी राज्यमंत्री आशीष जयस्वाल यांनी विधानसभेत  एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी याबाबत प्रश्न विचारला होता. नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातल्या शेतकऱ्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेचा लाभ देण्याची मागणी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी केली. यावर तपासून कार्यवाही करण्याचं आश्वासन कृषी मंत्र्यांनी दिलं.   राष्ट्...

March 5, 2025 3:50 PM March 5, 2025 3:50 PM

views 8

विधानसभेतून समाजवादी पार्टीचे अबु आझमी निलंबित

समाजवादी पार्टीचे आमदार अबु असीम आझमी यांना चालू अधिवेशन संपेपर्यंत सभागृहातून निलंबित करण्यात आलं आहे. औरंगजेबाचं उदात्तीकरण केल्याबद्दल आझमी यांना निलंबित करावं असा प्रस्ताव संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडला. यावर भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी हरकत घेत आझमी यांचं सदस्यत्व विधानसभेच्या पूर्ण कालावधीसाठी रद्द करण्याची मागणी केली. मात्र सदस्यत्व कायमचं रद्द करणं नियमात बसत नसून यासाठी आमदारांची समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिलं.   काँग्रेस नेते...

March 3, 2025 6:54 PM March 3, 2025 6:54 PM

views 15

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणानं प्रारंभ

राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला राज्यपालांच्या अभिभाषणाने आजपासून मुंबईत प्रारंभ झाला. सर्व समाज घटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतीशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी राज्य सरकार कार्यरत असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी अभिभाषणात केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या विविध योजनांचा आढावा घेतला.    देशाच्या एकूण स्थूल देशांतर्गत उत्पादनात राज्याचं १४ टक्क्यांपेक्षा अधिक योगदान असून थेट परकीय गुंतवणुकीसाठी महाराष्ट्राला पहिली पसंती आहे, असं ते म्...