June 27, 2025 10:03 AM June 27, 2025 10:03 AM

views 13

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु होणार आहे. याच कामकाज 18 जुलैपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत काल ही घोषणा करण्यात आली.  

March 24, 2025 8:15 PM March 24, 2025 8:15 PM

views 10

कर्नाटकातल्या कंत्राट आरक्षणासंदर्भात संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ

कर्नाटकात सरकारी कंत्राटांमधे मुस्लिमांसाठी आरक्षण ठेवल्याच्या तसंच या आरक्षणासंदर्भात संविधानात बदल करण्याविषयी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी केलेल्या टिप्पणीच्या मुद्द्यावर संसदेच्या दोन्ही सभागृहांमधे आज गदारोळ झाला. गोंधळामुळे राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी, तर लोकसभेचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं.    राज्यसभेत कामकाज सुरु होताच सत्ताधारी भाजपा सदस्यांनी या मुद्यावरुन घोषणा द्यायला सुरुवात केली. संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी हा मुद्दा उपस्थित केला. एका विशिष...

March 14, 2025 10:08 AM March 14, 2025 10:08 AM

views 3

येत्या २१ मार्चपासून पंजाबचं अर्थसंकल्पीय अधिवेशन

पंजाबचा 2025-26 या वर्षाचा अर्थसंकल्प 26 मार्च रोजी पंजाब विधीमंडळात मांडण्यात येणार आहे. विधीमंडळाचं विशेष अधिवेशन 21 ते 28 मार्च या कालावधीत होणार असून अर्थसंकल्प 26 मार्च रोजी सादर केला जाईल, असं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी काल सांगितलं.

March 10, 2025 7:02 PM March 10, 2025 7:02 PM

views 14

पुद्दुचेरी विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु

पुद्दुचेरी विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज नायब राज्यपाल के कैलाशनाथन यांच्या अभिभाषणाने सुरु झालं. पुद्दुचेरी चं राज्य स्थूल उत्पादन गेल्या ५ वर्षात दरसाल दरशेकडा ९ पूर्णांक ५६ शतांश दराने याप्रमाणे ४४ पूर्णांक ६ शतांश टक्क्यांनी वाढलं असल्याचं त्यांनी अभिभाषणात सांगितलं.   

March 10, 2025 1:24 PM March 10, 2025 1:24 PM

views 17

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू

संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं दुसरं सत्र आजपासून सुरू झालं. पीएम श्री योजनेच्या अंमलबजावणीबाबत तमिळनाडू सरकारवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी केलेल्या टिप्पणीच्या निषेधात द्रमुक सदस्यांनी गदारोळ केला. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या शाळांमधे पीएम श्री योजना लागू करण्याला तमिळनाडू सरकारने आधी संमती दिली मात्र आता घूमजाव करुन राज्यसरकार  विद्यार्थ्यांचं नुकसान करीत आहे, अशी टीका प्रधान यांनी केली होती. त्याच्या निषेधात झालेल्या घोषणाबाजीमुळे सभागृहाचं कामकाज अर्धा तास तहकूब करण्यात आ...

March 3, 2025 9:46 AM March 3, 2025 9:46 AM

views 11

जम्मू-काश्मीर विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू

जम्मू-काश्मीर विधानसभेचे महिनाभर चालणारे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज जम्मूमध्ये नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्या अभिभाषणाने सुरू होणार आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखालील हे पहिलंच अधिवेशन आहे. २०१८ मध्ये पीडीपी आणि भाजपा युतू सरकारच्या कार्यकाळांत अर्थसंकल्पीय अधिवेशन झालं होतं. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री ओमर अब्दुल्ला येत्या ७ तारखेला अर्थसंकल्प सादर करतील.

March 1, 2025 3:48 PM March 1, 2025 3:48 PM

views 12

अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु

राज्य विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून मुंबईत सुरु होणार आहे. अधिवेशनासाठी सुरक्षाव्यवस्था आणि तयारीचा आढावा काल घेण्यात आला.   विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सुरक्षा, वाहन तळ व्यवस्था, वैद्यकीय सुविधा अशा विविध बाबींचा आढावा घेतला. विधानभवनात काल झालेल्या या बैठकीला मुख्य सचिव सुजाता सौनिक, तसंच गृह, सामान्य प्रशासन, महानगरपालिका, वाहतूक, आरोग्य इत्यादी विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

January 18, 2025 1:22 PM January 18, 2025 1:22 PM

views 23

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या ३१ जानेवारीपासून सुरू होत आहे. दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीसमोर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाला प्रारंभ होईल.   केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन एक फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा त्यांचा सलग ८वा अर्थसंकल्प असून तो एक विक्रम आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा १३ फेब्रुवारी पर्यंत चालेल, त्यात ९ बैठका होतील.   यादरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाबद्दलच्या आभार प्रस्...

July 22, 2024 9:02 PM July 22, 2024 9:02 PM

views 13

सर्व राजकीय पक्षांनी आपली पक्षीय धोरणं बाजूला ठेवून पुढच्या साडे चार वर्षांसाठी स्वतःला देशासाठी समर्पित करावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

संसदेत उद्या सादर होणारा अर्थसंकल्प हा अमृत काळातला महत्वाचा अर्थसंकल्प असेल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्याआधी संसद भवन परिसरात ते बातमीदारांशी बोलत होते. हा अर्थसंकल्प पुढच्या पाच वर्षांची दिशा ठरवणार असून सरकारच्या विकसित भारत संकल्पनेचा पाया घालण्याचं काम याद्वारे होईल. भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे, देशात होणाऱ्या गुंतवणुकीमुळे इथं संधीची विपुलता आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. आपण जनतेला दिलेल्या हमीची अंमलबजावणी ...

July 17, 2024 9:48 AM July 17, 2024 9:48 AM

views 10

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.23 जुलै रोजी अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.या अधिवेशानाचं कामकाज 12 ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आलं आहे.