February 1, 2025 3:54 PM February 1, 2025 3:54 PM
7
मध्यमवर्ग आणि युवकांची निराशा करणारा अर्थसंकल्प असल्याचं विरोधकांचं मत
केद्रींय अर्थसंकल्पाने युवक आणि मध्यमवर्गीयांची निराशा केली आहे असं काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी म्हटलं आहे. बेरोजगारी आणि इतर महत्वाच्या समस्यांचा या अर्थसंकल्पात उल्लेख नसल्याची टीका त्यांनी केली. निवडणूक असलेल्या बिहार राज्यासाठी अनेक घोषणा आहेत मात्र दक्षिणेतल्या राज्यांकडे पूर्ण दुर्लक्ष केल्याचं द्रमुक चे खासदार दयानिधी मारन म्हणाले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी मात्र आयकर सवलती दिल्याबद्दल अर्थसंकल्पाची प्रशंसा केली आहे.