July 23, 2024 3:22 PM July 23, 2024 3:22 PM

views 12

अर्थसंकल्पात सामान्यांना दिलासा नाही – राहुल गांधी

सामान्य नागरिकांना या अर्थसंकल्पामुळे कोणताही दिलासा मिळालेला नाही. हा अर्थसंकल्प म्हणजे काँग्रेसचा जाहीरनामा आणि मागचे अर्थसंकल्प यांची नक्कल आहे, अशी प्रतिक्रिया लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दिली आहे.   सरकारला पाठिंबा देणाऱ्या राज्यांना या अर्थसंकल्पात भरभरून देण्यात आलं मात्र देशाला सर्वाधिक कर देणाऱ्या राज्याला अर्थसंकल्पात दुय्यम वागणूक दिल्याची टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

July 23, 2024 2:01 PM July 23, 2024 2:01 PM

views 16

अर्थसंकल्प २०२४ : भविष्य निर्वाह निधी धारकांसाठी विविध सवलतींची घोषणा

भविष्य निर्वाह निधी धारकांसाठी विविध सवलतींची घोषणा आज अर्थमंत्र्यांनी केली. त्यानुसार पहिल्यांदा नोकरीला लागणाऱ्या सर्व नोकरदारांच्या खात्यामध्ये एका महिन्याचा पगार जमा होईल. दर महिन्याला एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या सुमारे २१ कोटी  युवकांना याचा फायदा होणार आहे. रोजगार निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठीही त्यांनी काही आर्थिक सवलती जाहीर केल्या.    उत्पादन आणि सेवा क्षेत्रांना चालना देण्यासाठी येत्या पाच वर्षांत देशातल्या आघाडीच्या ५०० कंपन्यांमध्ये एक कोटी युवकांना वर्षभरासाठी इंटर्नशिप...

July 23, 2024 8:26 PM July 23, 2024 8:26 PM

views 9

महिला केंद्री विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प सादर

महिला केंद्री विकासाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात तीन लाख कोटी रुपये महिला तसंच मुलींसाठी असलेल्या योजनांना मंजूर करण्यात आले आहेत. आर्थिक विकासात स्त्रियांचा वाटा वाढवण्याच्या दृष्टीने आमच्या सरकारची वचनबद्धता दिसून येते.   आदिवासीबहुल गावे आणि जिल्हे यांच्या मधल्या आदिवासी कुटुंबांसाठी प्रधानमंत्री जनजाती उन्नत ग्राम अभियान सुरु केलं जाईल. त्याचा लाभ ६३ हजार गावं आणि ५ कोटी आदिवासींना होईल.   प्रधानमंत्री शहरी आवास योजनेच्या माध्यमातून १ कोटी शहरी गरीब आणि मध्यमवर्गीयांसाठी १०लाख ...

July 8, 2024 1:12 PM July 8, 2024 1:12 PM

views 16

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प सामान्य जनतेचा आहे – आमदार प्रवीण दरेकर

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा सामान्य जनता, शेतकरी, कष्टकरी, वंचित, महिला, उपेक्षितांचा अर्थसंकल्प आहे, खोट्या गोष्टी पसरवणाऱ्यांचं तोंड बंद करणारा हा अर्थसंकल्प आहे, असं प्रतिपादन विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी आज अर्थसंकल्पावरच्या चर्चेदरम्यान केलं. शेतकरी, महिला, वारकरी, बेरोजगार या समाजघटकांसाठी या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या विविध योजनांचा पुनरुच्चार त्यांनी केला. सीमाभागातल्या मराठी शाळा, सहकार विभाग, शहरी बँका, गृहनिर्माण संस्था, तसंच रायगड पर्यटन आराखडा, कोकणासाठी निधी, एसटी ...

July 7, 2024 7:39 PM July 7, 2024 7:39 PM

views 14

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व विचारविनिमय

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली अर्थसंकल्पपूर्व विचारविनिमय  नुकताच पूर्ण झाला. या बैठकांच्या सत्रात  संबंधित १० गटांमधले १२० हून अधिक निमंत्रित, शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी आणि कृषी अर्थशास्त्रज्ञ सहभागी झाले होते. तसंच कामगार संघटना, शिक्षण आणि आरोग्य क्षेत्र, रोजगार आणि कौशल्य, सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग; व्यापार आणि सेवा, उद्योग, अर्थतज्ञ, वित्तीय क्षेत्र आणि भांडवली बाजारासह पायाभूत सुविधा क्षेत्र, ऊर्जा आणि शहरी क्षे...