October 2, 2025 1:39 PM October 2, 2025 1:39 PM
57
अर्थसंकल्पावर सहमती होऊ न शकल्यानं अमेरिकेत सरकारी कामकाज ठप्प
अर्थसंकल्पावर सरकार आणि विरोधक यांच्या सहमती होऊ न शकल्यानं अमेरिकेत अजूनही सरकारी कामकाज ठप्प आहे. अनेक अत्यावश्यक गोष्टींपासून यामुळं सुटका होईल, अशी प्रतिक्रिया अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे. यामुळं हजारो सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर टांगती तलवार आहे. मात्र अत्यावश्यक सेवा सुरू आहेत. सरकारी कामकाज ठप्प व्हायला संसदेतले डेमोक्रेटिक पक्षाचे सदस्य जबाबदार असल्याचा आरोप व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेविट यांनी केला आहे. मार्च महिन्यात डेमोक्रेटिक पक्षानं मं...