May 12, 2025 6:34 PM May 12, 2025 6:34 PM
3
देशभरात आज बुद्धपौर्णिमा साजरी
देशभरात आज बुद्धपौर्णिमा साजरी केली जात आहे. बिहारमध्ये बुद्धगया इथं थायलंड, व्हिएतनाम आणि म्यानमार या देशांमधून लाखो अनुयायी बुद्धजयंतीनिमित्त दाखल झालेत. यानिमित्तानं महाबोधी विहारात विशेष प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बुद्धपौर्णिमेनिमित्त देशवासीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. सत्य, समानता आणि सौहार्द या तत्वांवर आधारित भगवान बुद्धांची शिकवण मानवतेसाठी मार्गदर्शक असल्याचं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राज्यात विविध ठिकाणी बुद्धपौर्णिमेनि...