June 1, 2025 1:35 PM June 1, 2025 1:35 PM

views 14

देशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ठीक नसल्याची बसपाच्या प्रमुख मायावती यांची टीका

उत्तरप्रदेशासह देशभरात सामंतवादी आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या वर्चस्वामुळे जातीय भेदभाव आणि हिंसेसारख्या घटना घडत आहेत. यामुळे देशात कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती ठीक नाही हे दिसतं, असं बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी म्हटलं आहे. उत्तरप्रदेशाने देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे, मात्र गुन्हेगारी आणि गरीबी यांच्या चर्चेमुळे राज्याची प्रतिमा डागाळली जाते असं त्या म्हणाल्या.

November 24, 2024 7:38 PM November 24, 2024 7:38 PM

views 7

ईव्हीएमचा प्रश्न मिटेपर्यंत बसपा कोणत्याही पोटनिवडणुकीत भाग घेणार नाही- मायावती

ईव्हीएम अर्थात, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांचा प्रश्न मिटेपर्यंत बहुजन समाज पार्टी कोणत्याही पोटनिवडणुकीत भाग घेणार नाही, असं पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी आज जाहीर केलं. त्या लखनौ इथं पक्षाच्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होत्या. उत्तरप्रदेशात नुकत्याच झालेल्या ९ विधानसभा मतदारसंघामधल्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया आणि निकालांबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु आहे.   मतपत्रिकांद्वारे मतदान होत होतं त्यावेळी बनावट मतदारांचा उपयोग केला जायचा, आता ईव्हीएमचा वापर करुन तसाच प्रकार केला जात आहे, असा आर...