September 26, 2025 2:37 PM

views 22

देशभरात ९८ हजार ठिकाणी बीएसएनएल 4G यंत्रणा बसवण्याची केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची घोषणा

देशभरात सुमारे ९८ हजार ठिकाणी बीएसएनएल फोर जी यंत्रणा बसवण्याची घोषणा केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज माध्यमांसमोर केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या त्याचं उद्घाटन करतील. ही यंत्रणा नंतर फाय-जीमध्ये रुपांतरित केली जाईल असंही त्यांनी सांगितलं. देशातल्या प्रत्येक भागात ही यंत्रणा बसवली जाईल. डिजिटल भारत निधीद्वारे देशात १०० टक्के फोरजी सॅच्युरेशन नेटवर्कचं अनावरण देखील शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं. या नेटवर्कच्या माध्यमातून ३० हजार गावं जोडली गेली आहेत.

July 28, 2025 3:18 PM

views 8

BSNL ला २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिमाहीत २६० तर चौथ्या तिमाहीत २८० कोटी रुपयांचा नफा

बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडला,२०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २६०, तर चौथ्या तिमाहीत २८० कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज वार्ताहरांना ही माहिती दिली. बीएसएनएलच्या सहकार्यानं दूरसंचार विभागानं आयोजित केलेल्या दोनपैकी पहिल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. २०२४- २५ या वर्षात कंपनीचा भांडवली खर्च २५ हजार कोटी झाला असून तो आत्तापर्यंतचा सर्वाधिक असल्याचं त्यांनी सांगितलं. त्याचप्रमाणे गेल्या वर्षी जूनपर्यंत ८ ...

February 14, 2025 8:15 PM

views 18

१७ वर्षात पहिल्यांदाच BSNL ला तिमाही निकालात नफा

सरकारी मालकीच्या भारत संचार निगम लिमिटेडला २०२४-२५ या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत २६२ कोटी रुपयांचा नफा झाला आहे, अशी माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथे ते माध्यमांशी बोलत होते. गेल्या १७ वर्षांत प्रथमच बीएसएनएलने तिमाही नफा नोंदवला असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार दूरसंचार क्षेत्र हे भारताच्या डिजिटल भविष्याचा मार्ग असेल, असंही शिंदे यावेळी म्हणाले.

January 31, 2025 3:50 PM

views 12

बीएसएनएलच्या ‘बल्क पुश एसएमएस ए टू पी’ सेवेचं उद्घाटन

मोबाईल फोनवर बँकांना एकाच वेळी मोठ्या प्रमाणात एसएमएस पाठवता येतील अशा सुरक्षित सेवेचं व्यासपीठ बीएसएनएलने उपलब्ध करुन दिलं आहे.  बीएसएनएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ए. रॉबर्ट जे. रवी यांच्या हस्ते या बल्क पुश एसएमएस ए टू पी सेवेचं उद्घाटन काल मुंबईत झालं. बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध बँकांचे अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

October 23, 2024 9:51 AM

views 9

बीएसएनएलतर्फे सात नव्या ग्राहक-केंद्रित सेवा सुरू

बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडनं ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सात नव्या ग्राहक-केंद्रित सेवा सुरू केल्या आहेत. कंपनीचं नवीन बोधचिन्ह आणि सात नव्या सेवांचं अनावरण करताना केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी याबद्दल माहिती दिली. स्पॅम-फ्री नेटवर्क, नॅशनल वाय-फायरोमिंग, इंट्रानेट फायबर टीव्ही, एनीटाइम सिम किओस्क, डायरेक्ट-टू-डिव्हाइस सेवा, सार्वजनिक संरक्षण - आपत्ती निवारण आणि खाणींमध्ये प्रथमच फाइव्ह-जी या सेवांचा त्यात समावेश आहे.   फायबर टू द होम सेवेद्वारे ग्राहकांन...

October 22, 2024 8:24 PM

views 9

केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते बीएसएनएलच्या नव्या लोगोचं उद्घाटन

स्वतःचे फोर जी तंत्रज्ञान विकसित करणाऱ्या जगातल्या सहा देशांपैकी भारत हा एक देश असून लवकरच फाईव्ह जी तंत्रज्ञान विकसित केलं जाईल, असं प्रतिपादन केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज दिल्ली इथं केलं. बीएसएनएल अर्थात भारत संचार निगम लिमिटेडच्या नव्या लोगोचं  आणि नव्या ७ सेवांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झालं. त्यावेळी ते  बोलत होते.  बी एस एन एल च्या वापरकर्त्यांची संख्या गेल्या सहा महिन्यात ७५ लाखांवरून १ कोटी ८० लाख इतकी झाली  आहे.  बी एस एन एल  आता  स्पॅम फ्री नेटवर्क , नॅशनल वाय...