May 14, 2025 12:45 PM May 14, 2025 12:45 PM

views 13

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय सीमा सुरक्षा दलाच्या जवानाची घरवापसी

पंजाबमध्ये फिरोझपूर क्षेत्रात चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणाऱ्या सीमा सुरक्षा दलाच्या जवानाला आज पाकिस्ताननं भारताकडे सुपूर्द केलं. अमृतसरजवळच्या अटारी  संयुक्त चौकीजवळ हस्तांतरणाचा कार्यक्रम शांततेत झाला, असं जालंधर इथल्या आकाशवाणी प्रतिनिधीनं कळवलं आहे. सीमावर्ती भागातल्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेसाठी तैनात पथकातला हा जवान २३ एप्रिलला चुकून सीमापार क्षेत्रात गेला असता पाकिस्तानी सैन्यानं त्याला ताब्यात घेतलं होतं.