November 21, 2025 1:32 PM November 21, 2025 1:32 PM

views 26

BSF ला जगातलं सर्वात आधुनिक दल बनवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य – गृहमंत्री

अतुलनीय शौर्य, धैर्य दाखवून प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी देशाचं संरक्षण केलं असून देशाला त्यांचा अभिमान असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं. सीमा सुरक्षा दलाच्या ६१व्या स्थापनादिनानिमित्त गुजरातमध्ये भूज इथे आयोजित संचलन समारंभात ते बोलत होते. गेली सहा दशकं सीमा सुरक्षा दल देशाच्या सीमांचं रक्षण करत असून हे दल सीमेवर असताना शत्रू एक इंचही घुसखोरी करू शकत नाही, हे संपूर्ण जगाला दाखवून दिल्याचं शहा म्हणाले.   गृह मंत्रालयाने पुढच्या पाच वर्...

May 21, 2025 1:19 PM May 21, 2025 1:19 PM

views 17

पंजाबमध्ये पाकिस्तानी घुसखोऱ्याकडून ३३० पाकिस्तानी रुपये जप्त

पंजाबमधल्या अमृतसर इथं एका पाकिस्तानी घुसखोराला सीमा सुरक्षा दलानं काल अटक केली. ही व्यक्ती आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतीय सीमेच्या आत येण्याचा प्रयत्न करत होता, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी त्याला थांबवलं आणि ताब्यात घेतलं. त्या व्यक्तीची झडती घेतली असता त्याच्याकडे ३३० पाकिस्तानी रुपये सापडले. सीमा सुरक्षा दलानं त्याला स्थानिक पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

December 1, 2024 1:39 PM December 1, 2024 1:39 PM

views 15

सीमा सुरक्षा दलाच्या साठाव्या वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्र्यांकडून कौतुक आणि अभिनंदन

सीमा सुरक्षा दल आज आपला ६० वा वर्धापन दिन साजरा करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सीमा सुरक्षा दलाच्या कामगिरीचं कौतुक करत वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हे दल म्हणजे धैर्य, समर्पण आणि असामान्य सेवेचं प्रतीक असून या दलाची दक्षता आणि शौर्यानं आपल्या देशाच्या सुरक्षिततेत कायमच महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही सीमा सुरक्षा दलाला वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

September 11, 2024 1:42 PM September 11, 2024 1:42 PM

views 10

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन केलेल्या गोळीबारात BSF चा एक जवान जखमी

पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन करत जम्मू - काश्मिरमध्ये अखनूर इथल्या नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.   मध्यरात्री अडीचच्या सुमारास नियंत्रण रेषेजवळ असलेल्या भारतीय चौक्यांवर गोळीबार केल्याची माहिती बीएसएफच्या प्रवक्त्यानं दिली. या घटनेनंतर जवानांना अधिक सतर्क राहण्याच्या तसंच सीमाभागातील गस्त वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत.