January 18, 2025 10:41 AM January 18, 2025 10:41 AM

views 6

पियुष गोयल आजपासून तीन दिवसांच्या ब्रुसेल्स दौऱ्यावर

वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष गोयल आजपासून तीन दिवसांच्या ब्रुसेल्स दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान ते व्यापार आणि आर्थिक सुरक्षा आयोगाच्या आयुक्त मारोज सेफकोविक यांच्याबरोबर उच्च स्तरीय बैठक घेतील.   दोन्ही नेत्यांमध्ये भारत-युरोपियन महासंघांदरम्यान मुक्त व्यापार करारासंदर्भात वाटाघाटी आणि इतर द्विपक्षीय व्यापार बाबींच्या अनुशंगानं चर्चा होण्याची अपेक्षा आहे. अशी माहिती वाणिज्य मंत्रालयानं दिली आहे.